Home »National »Delhi» Special Website For Love Sex And Risk

लव्ह, सेक्स आणि धोका समस्येवर खास वेबसाइट

वृत्तसंस्था | Jan 18, 2013, 07:46 AM IST

  • लव्ह, सेक्स आणि धोका समस्येवर खास वेबसाइट

नवी दिल्ली - लव्ह, सेक्स आणि रिलेशनशिप हे नवीन पिढीचे परवलीचे शब्द आहेत. यासंदर्भात जाणून घेण्याची इच्छा असूनही व्यासपीठ नसल्याने होणारी घुसमट दूर करणारी वेबसाइट तरुण आणि जिज्ञासूंच्या मदतीला आली आहे. त्यामुळेच सोप्या भाषेतील फ्रेंडली व्यासपीठ असे त्याचे वर्णन करण्यात आले आहे.

लव्ह मॅटर्स असे वेबसाइटचे नाव आहे. रेडिओ नेदरलँड वर्ल्डवाइडने वेबसाइट सुरू केली आहे. तरुणांना अनेक प्रश्न असतात. त्याची सोडवणूक करणारे योग्य साधन त्यांच्याजवळ उपलब्ध नसल्याने आणखीनच संभ्रम निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. संस्कार किंवा संकोचामुळे म्हणा पण त्यांना आई-वडिलांकडून वैवाहिक जीवनाविषयी माहिती घेण्याची इच्छा नसते. अशा परिस्थितीत ‘लव्ह मॅटर्स’ त्यांना एका क्लिकवर सर्व शास्त्रीय माहिती देते, असे भारतीय प्रकल्पाच्या प्रमुख वितीका यादव यांनी सांगितले. एनजीओ तारशीच्या मदतीने साइटची निर्मिती करण्यात आली आहे. वैवाहिक संबंध, अपत्य प्राप्ती, लैंगिक आरोग्याच्या प्रश्नावर गेल्या तेरा वर्षांपासून ही एनजीओ हेल्पलाइन चालवते. त्याचा अनुभव वेबसाइट विकासात झाला आहे. साईटवर ‘वेडिंग नाइट फियर्स’, ‘सेक्स आफ्टर प्रेग्नन्सी’ अशा विषयांवरील लेख त्यावर वाचायला मिळू शकतात. तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी गुगल अनॅलिटिक्सची मदत घेण्यात आली आहे.
भारतासाठी हिंदी साइट
लव्ह मॅटर्सचे भारतात हिंदी संकेतस्थळ आहे. त्यामध्ये स्थानिक आशयाला महत्त्व दिलेले आहे. त्यात ‘आँटीजी’ नावाचे विभाग आहे. त्यामध्ये व्हिजिटर्स आपल्या समस्या विचारू शकतात. दोन वर्षांपूर्वी इंग्लिश साइट सुरू करण्यात आली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर 2011 मध्ये हिंदी साइट सुरू झाली आहे.
तरुणांचा निर्णय दूरगामी
मूल होण्यासंबंधी तरुण पिढीकडून घेण्यात येणारा निर्णय त्यांच्या वैयक्तिक जीवनावर दूरगामी परिणाम करणारा असतो. त्यांच्याबरोबरच तो समाजावरही प्रभाव टाकतो, असे निरीक्षण वेबसाइटने केलेल्या अभ्यासातून दिसून आले आहे.

Next Article

Recommended