आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखचा बंगला पुन्हा वादात, प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा मन्नत बंगला पुन्हा एकदा वादात अडकला आहे. सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत मन्नत बंगला नियम धाब्यावर बसवून बांधण्यात आल्याचे नमुद करण्यात आले आहे.
मन्नत बंगला तयार करतांना शाहरुखने समुद्र किना-यावर बांधकामाशी संबंधित कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. तसं पाहता, शाहरुखने या आरोपांचे खंडन केले आहे. बंगल्याचे बांधकाम करतांना कोणताही कायदा तोडला नसून बांधकाम करण्यापूर्वी नगर विकासची परवानगी घेतली असल्याचे शाहरुखने सांगितले आहे.
शाहरुखविरोधात सिमप्रीत सिंह आणि अमित मरौद यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे.
बॉम्बे हायकोर्टाच्या निकालाला आव्हान देत सिमप्रीत सिंह आणि अमित मरौद यांनी ही याचिका दाखल केली आहे. शाहरुखविरोधात प्रसिद्धी मिळवण्यासाठी याचिका दाखल केली असल्याचे सांगून बॉम्बे हायकोर्टाने ती याचिका रद्द केली होती. शिवाय याचिकाकर्त्यांना २० हजारांचा दंडही भरावा लागला होता.
सुझान रोशन सजवणार शाहरुखचा मन्नत बंगला
शाहरुखकडं मन्नत असेल तर माझ्याकडं जन्नत