आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stampede In Allahabad Caused By Wrong Announcement Of Railway

अलाहाबाद चेंगराचेगरीः राज्‍य सरकारने जबाबदारी झटकली; मृतदेहासाठी मागितली जातेय लाच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- अलाहाबादमध्‍ये रेल्‍वे स्‍थानकावर झालेल्‍या चेंगराचेंगरीमध्‍ये 36 जणांचा मृत्‍यू झाला. तसेच अनेक जण जखमी झाले आहेत. परंतु, पीडितांना योग्‍य प्रकारे मदत पुरविण्‍याऐवजी प्रशासनामध्‍ये जबाबदारी ढकलण्‍यासाठी चढाओढ सुरु झालेली दिसत आहे. उत्तर प्रदेश सरकारने अपघाताची जबाबदारी रेल्‍वे प्रसासनाकडे ढकलली आहे.

उत्तर प्रदेश सरकारच्‍या वतीने पत्रकार परिषद घेण्‍यात आली. त्‍यात पंयाचत राज मंत्री बलराम सिंह यांनी सांगितले की, गर्दी खूप होती. अंदाजापेक्षा जास्‍त गर्दी झाली. कुंभ मेळ्यात स्‍नानामध्‍ये लोकांना कोणतीही अडचण आली नाही. परंतु, रेल्‍वे स्‍थानकावर अपघात झाला. रेल्‍वे प्रशासनाच्‍या बेजबाबदारीमुळे ही घटना घडली आहे. या घटनेची महिनाभरात चौकशी करुन जबाबदारी निश्चित करण्‍यात येईल.

दरम्‍यान, कुंभ मेळा आयो‍जन समितीचे प्रमुख आझम खान यांनी नैतिक जबाबदारी स्विकारुन राजीनामा दिला आहे.


एकीकडे नातेवाईकांच्‍या मृत्‍यूमुळे लोकांमध्‍ये दुःखाचे वातावरण आहे. परंतु, त्‍यांना दिलासा देण्‍याऐवजी प्रशासनाकडून त्रासच जास्‍त होत आहे. मृतदेह सोपविण्‍यासाठी लाच मागण्‍यात येत आहे. हरियाणातून आलेल्‍या एका व्‍यक्तीने स्‍वरुप राणी रुग्‍णालयात एका कर्मचा-याने 1200 रुपये मागितल्‍याचा आरोप केला आहे. हे कळताच लोकांनी गदारोळ घातला.