आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळ निवारणासाठी राज्याने मागितले केंद्राकडे 2270 कोटी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- राज्यातील दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याकडे 2270 कोटी रुपयांची मागणी केली आहे. चारा छावण्यांसाठी अतिरिक्त निधी मिळावा, अशी मागणी त्यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेऊन केली. यावर हा प्रस्ताव उच्चाधिकार समितीच्या बैठकीत ठेवण्याचे आश्वासन पवार यांनी दिले.

राज्याने यापूर्वी पाच हजार कोटींची मागणी केली होती. केंद्राच्या निकषांपेक्षा जास्त दिवस चारा छावण्या सुरू असल्याने त्यावर जास्त खर्च होत आहे. त्यामुळे हा निधी राज्याला मिळण्याची शक्यता आहे.असून यासंदर्भात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगट नेमण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यातील रबी पिकांची स्थितीही दयनीय असून, पाहणीसाठी पथक पाठवावे, अशी विनंतीही चव्हाण यांनी कृषीमंत्र्यांना केली. दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी नेमलेल्या कस्तुरीरंगन आयोगाच्या शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.