आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • States, UTs Not To Give Nod For Statues At Public Places Says SC

सार्वजनिक ठिकाणी पुतळे उभारण्‍यास मंजूरी देऊ नकाः सर्वोच्‍च न्‍यायालयाचे निर्देश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- सार्वजनिक ठिकाणी कोणतेही पुतळे किंवा बांधकाम करण्‍याची परवानगी राज्‍य सरकारांनी देऊ नये, असे निर्देश सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिले आहेत. वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, असे कोणतेही बांधकाम करु देऊ नये, असे न्‍यायालयाने बजावले आहे.

केरळमध्‍ये राष्‍ट्रीय महामार्गावर एका ठिकाणी एका नेत्‍याचा पुतळा उभारण्‍यासंदर्भात सर्वोच्‍च न्‍यायालयात सुनावणी सुरु आहे. यावेळी न्‍यायालयाने सर्व राज्‍य सरकारे तसेच केंद्रशासित प्रदेशांना निर्देश दिले आहेत. वाहतूक सिग्‍नल्स किंवा दिवे बसविण्‍सास परवानगी राहील, असेही न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले आहे. सर्वोच्‍च न्‍यायालयाने यापुर्वीच वाहतूक‍ीला अडथळा ठरणारी धार्मिक तसेच इतर सर्व बांधकामे हटविण्‍याचे निर्देश दिले आहेत. चौकांमध्‍ये किंवा वाहतुकीच्‍या सिग्‍नल्‍सच्‍या जागेवर राजकीय नेत्‍यांचे पुतळे उभारण्‍यात येतात. त्‍यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. न्‍यायालयाच्‍या निर्देशामुळे राजकीय नेत्‍यांचे कुठेही पुतळे उभारण्‍यास चाप बसेल.