आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Steamed In Kubhamela: High Court Issued Notice To Up And Maharashtra

कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीचे प्रकरण : उच्च न्यायालयाचा युपी व रेल्वेला नोटीस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - रविवारी अलाहाबाद रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अलाहाबाद हायकोर्टाने उत्तर प्रदेश सरकार तसेच रेल्वेला नोटीस बजावली आहे. एका आठवड्यात यावर स्पष्टीकरण देण्यास कोर्टाने सांगितले आहे. या चेंगराचेंगरीत 36 जणांचा मृत्यू झाला, 39 लोक जखमी झाले होते.

राज्य सरकारने केलेली वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्थेची माहिती हायकोर्टाने मागितली आहे. रेल्वेने कुंभमेळ्यातील भाविकांना परत पाठवण्यासाठी काय व्यवस्था केली, याची विचारणाही कोर्टाने केली आहे. एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने हे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी 20 फेब्रुवारीला होत आहे.
याचिकेत दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींना कठोर शासन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.