आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसद अद्यापही असुरक्षितच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली - संसद हल्ल्याच्या घटनेला दशकभराचा कालावधी उलटला. घटनेतील दहशतवादी अफजल गुरूला फाशीही देण्यात आली, परंतु देशाच्या सर्वोच्च संस्थेच्या सुरक्षेचा प्रश्न पुरेसा सुटलेला नाही. संसदेसाठी विशेष सुरक्षा दलाच्या (पीडीजी) स्थापनेला एक वर्ष उलटूनही त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. केंद्रीय राखीव सुरक्षा दलामधील प्रशिक्षित पुरुष-महिला जवानांची निवड करण्याची योजना त्यात आहे. त्याला पार्लमेंट ड्यूटी ग्रुप (पीडीजी) असे नाव देण्यात आले. 2001 मध्ये झालेल्या संसदेवरील हल्ल्यानंतर सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यानंतर दहा वर्षांच्या कालखंडानंतर गृहमंत्र्याने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्याला मंजुरी दिली होती.