आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापृथ्वीवरील स्वर्ग म्हणून काश्मिरला ओळखले जाते. या स्वर्गवत भागात सोपोर येथे झेलम नदीच्या काठावर वसलेल्या शीर जागीर नावाच्या गावात अफझल गुरुचा जन्म झाला. याच गावात तो लहानाचा मोठा झाला. गावात पोहोचण्यासाठी लष्कराच्या एका छावणीतून जावे लागते. या गावाला लागुन असलेल्या परिसरात सफरचंदाचे बगीचे आहेत. गावात अफझलचे दोन मजली घर आहे. समोर हिरवळ आहे. घराला कुलूप लागले आहे. काही महिन्यांपूर्वी अफझलचा लहान भाऊ हिलाल राहत होता. अफझलला 3 भाऊ होते. गेल्या वर्षी कसाबला फाशी झाल्यानंतर अफझलचा भाऊ घाबरला होता. पुढचा नंबर अफझलचा राहू शकतो, असे त्याने पत्नीला सांगितले होते. त्यानंतर हिलालने कुटुंबियांसह घर सोडले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.