आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांसाठी गणित अजूनही डोकेदुखीच

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मुलांच्या शिक्षणासाठी ग्रामीण भागातही खासगी शाळा आता पहिल्या पसंतीच्या ठरल्या आहेत. देशातील विविध राज्यांतील गावांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून हे चित्र समोर आले आहे. ग्रामीण भारतातील 6 ते 14 वयोगटातील मुलांचा ओढा सरकारी शाळांपेक्षा खासगी शाळांकडेच अधिक आहे. ट्यूशन वाढले आहे. शिक्षणाचा दर्जा घसरला आहे. उपस्थितीही घटली आहे. गणित हा विषय मुलांना आजही डोकेदुखीच वाटत असल्याचे प्रथम या संस्थेच्या वतीने ग्रामीण भारतावर जारी करण्यात आलेल्या ‘असर 2011’ या अहवालात म्हटले आहे. मानव संसाधन विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी हा अहवाल प्रसिद्ध केला.
बिहार वगळता अन्य राज्यांतील 558 जिल्हे, 16017 गावे, 3,27372 घरे आणि 633465 मुलांचा हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
गणिताबाबत अद्यापही मुलांमध्ये नाराजीचा सूरच असल्याचे उपलब्ध आकडे सांगतात. हा विषय बहुतांश विद्यार्थ्यांना अजूनही डोकेदुखीच वाटतो. 2010 मध्ये 36.3 टक्के विद्यार्थी दोन अंकी संख्येतून हातचा राहिलेला एक वजा करण्यात सक्षम होते. 2011 मध्ये त्यात घट होऊन हे प्रमाण 29.9 टक्क्यांवर आले आहे. 2010 मध्ये पाचव्या वर्गातील 70.9 टक्के विद्यार्थी वजाबाकीचा प्रश्न सोडविण्यात सक्षम होते. त्यात घट होऊन 2011 मध्ये हे प्रमाण 64 टक्क्यांवर आले आहे. ही घसरण जवळपास सर्वच राज्यांमध्ये आढळून आली आहे.
महाराष्ट्रासह आठ राज्यात खासगी शाळांना पसंती
महाराष्ट्र, राजस्थान, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, आंध्रप्रदेश, केरळ, मणीपूर आणि मेघालयासारख्या राज्यांतील गावांमध्ये मागील पाच वर्षात खासगी शाळांमध्ये प्रवेश घेणाºयांच्या प्रमाणात 10 टक्के वाढ झाली आहे. या अहवालानुसार, महाराष्ट्र, हरियाणा, उत्तरप्रदेश, नागालँड, पंजाब, जम्मू काश्मीर, राजस्थान आणि आंध्रप्रदेशच्या ग्रामीण भागातील 30 ते 50 टक्के मुलांनी खासगी शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. अभ्यासाच्या स्तरामधील सुधारणेबाबत काही राज्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गुजरात, पंजाब, तामीळनाडू आणि काही पूर्वेत्तर राज्यांमध्ये 2010 च्या तुलनेत 2011 मधील टक्केवारी चांगली आहे. कर्नाटक आणि आंध्रप्रदेशाच्या आकडेवारीमध्ये कोणताही बदल नाही.