आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेखप्रकरणी स्वामींची चौकशी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - चिथावणीखोर लेख प्रकरणात जनता पार्टीचे अध्यक्ष सुब्रह्मण्यम स्वामी यांची सोमवारी दिल्ली पोलिसांनी दोन तास चौकशी केली. स्वामी काही वकिलांना सोबत घेऊन सकाळी 10 वाजून 50 मिनिटांनी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या इंटरस्टेट सेलमध्ये पोहोचले. या प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने अटकेविरुद्ध 30 जानेवारीपर्यंत अंतरिम जामीन दिला आहे. माझ्या लेखातील काही शब्दांचा अर्थ समजावून घेण्यासाठी पोलिसांनी मला बोलावले होते. मूळ लेख 4 हजार शब्दांचा होता, त्यापैकी 1100 शब्दच छापल्याचे स्वामी यांनी चौकशीनंतर पत्रकारांना सांगितले.
कोणकोणते परिच्छेद काढून टाकण्यात आले याची माहिती पोलिसांना देण्यात आली. मी जेव्हा अमेरिकेत होतो, त्या वेळी हा लेख लिहिला होता. तेथून तो वृत्तपत्राला मेलद्वारे पाठविला होता, असा दावा त्यांनी केला आहे. माझा संपूर्ण लेख वाचल्यास माझ्याविरुद्ध कोणताही खटला दाखल होऊ शकत नाही, हे आपल्या लक्षात येईल,
असे स्वामी म्हणाले. जो संपादित लेख छापून आला तो मूळ लेखाच्या भावनेशी मिळताजुळता आहे काय? या प्रश्नावर त्यांनी लेख संपादित करणे हा संपादकांचा अधिकार असल्याचे म्हटले.