आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साखरेने गाठली चाळिशी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ऐन सणांच्या तोंडावर साखरेची गोडी महागली आहे. महिन्याभरात किरकोळ बाजारात साखरेचे भाव किलोमागे 5 रुपयांनी वाढून 39 ते 40 रुपये झाले आहेत. कमी पावसामुळे महागाईला चालना मिळाली आहे. आगामी काळात एक किलो साखरेसाठी 44 ते 45 रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे.
घाऊक बाजारात मंगळवारी साखरेच्या भावात क्विंटलमागे 100 रुपयांची वाढ होऊन भाव 4000 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला. 2012 मधील हा उच्चांक आहे. महिन्यापूर्वी 35 रुपये किलो मिळणा-या साखरेसाठी आता 39 रुपये मोजावे लागत आहेत.
४औरंगाबादेतील मोंढ्यात अन्नधान्यांसह सर्वच वस्तूंची आवक 20 ते 30 टक्क्यांनी मंदावली आहे. त्यातच पावसाने डोळे वटारल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. गेल्या दीड महिन्यात साखरेच्या भावात 20 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गहू, सोयाबीन, मका यांच्याबाबतीतही असेच घडते आहे.’’
नानासाहेब अधाने, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती, औरंगाबाद