आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुखोई ३० विमानांच्या डिझाईनमध्ये त्रूटी - वायुसेना प्रमुख

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ पुणे - वायुसेनेला रशियन बनावटीच्या सुखोई ३० सुपरसॉनिक लढाऊ विमानांमध्ये डिझाईनसंबंधी त्रूटी अढळली आहे. मात्र, याचा त्यांच्या क्षमतेवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही, असे वायुसेना प्रमुख एन.के.ब्राऊन यांनी म्हटले आहे
येथील आर्म फोर्स मेडिकल कॉलेजच्या सुवर्ण जयंतीनिमीत्त आयोजित समारंभानंतर ब्राऊन पत्रकारांशी चर्चा करत होते. ते म्हणाले, वायुसेनेने विमानात असलेली 'फ्लाय बाय वायर' समस्या शोधून काढली आहे. डिझाईन संबंधातील ही समस्या आहे. डिझाईन एजंन्सीला देखील याची माहिती देण्याता आली आहे.
१३ डिसेंबर २०११ला सुखोई ३० एमकेआय विमानाच्या दुर्घटनेचा उल्लेख करुन ब्राऊन म्हणाले, अशा घटना परत होणार नाही याची पूर्ण काळजी घेण्यात येत आहे. विमान किंवा त्याची क्षमता यात कोणतीही त्रूटी नाही. मी स्वतः त्या विमानाचे उड्डान केले आहे.
फ्रान्सच्या राफेल विमानांच्या प्रस्तावित खरेदीबद्दल चर्चा सुरु असून या आर्थिकवर्षाच्या शेवटापर्यंत त्याबद्दल निर्णय घेतला जाईल, असे ब्राऊन यांनी सांगितले.
हवाई दल प्रमुखांनी घेतली सुखोई भरारी
वायुदलाच्‍या ताफ्यात दाखल होणार सुपर सुखोई
\'सुखोई\' अपघात तपासासाठी रशियन तज्‍ज्ञ दाखल, भारत आणखी 42 विमाने खरेदी करणार
पुण्याजवळ लष्कराचे विमान सुखोई-30 कोसळले; पायलट सुखरूप