आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनिता विल्यम्सची अंतराळवारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय वंशाची अंतराळवीर सुनिता विल्यम्स हिने तिच्या दुसर्‍या अवकाश प्रवासाची सुरूवात केली आहे. भारतीय प्रमाणवेळॆनुसार सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी कझाकिस्तानातील बैकोनूर तळावरून तिने अंतराळात उड्डाण केले.
सुनिता चार महिने अंतराळात राहणार असून रशियाच्या फेडरल स्पेस एजन्सीचा फ्लाइट इंजिनिअर युरी मालचेन्को आणि जपान एरोस्पेस एक्‍सप्लोरेशनचा अकिहिको होशिडे हे अंतराळवीर सुनीताचे सहकारी असणार आहेत, अशी माहिती 'नासा'तर्फे देण्यात आली. यापूर्वी 2006 मध्ये आंतराष्ट्रीय अ वकाश स्थानकात सहा महिने राहण्याचा विक्रम सुनिताच्या नावावर आहे.
सुनीताची ही दुसरी अंतराळ मोहिम आहे. खास बाब म्‍हणजे ती एक बेडुक आणि एक मासोळी सोबत घेऊन गेली आहे.. अंतराळात प्राणी कसे राहतात, याचे निरिक्षण याद्वारे शक्‍य होईल. ही मोहिम नोव्‍हेंबरमध्‍ये संपणार आहे. सुनीता विलियम्‍स ही 'एक्‍सपीडीशन-32'ची फ्लाईट इंजिनिअर आहे. ही चमू दोन दिवसांमध्‍ये बेकोनूर स्‍पेस स्‍टेशनला पोहोचेल.

अंतराळातून बजावणार सुनिता मतदानाचा हक्क
PHOTOS: चीनी महिलेने घेतली अंतराळात भरारी!
मंगळावर ‘मंगल’: नासाने जारी केली आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट छायाचित्रे!