आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supporters Compare Narendra Modi With Swami Vivekanand

स्‍वामी विवेकानंद यांच्‍यासोबत नरेंद्र मोदींची तुलना

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबादः गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांच्‍या समर्थकांना त्‍यांच्‍यात स्‍वामी विवेकानंद यांची छवि दिसत आहे. समर्थकांनी मोदी यांची स्‍वामी विवेकानंद यांच्‍यासोबत तुलना केली आहे. गुजरातमधील एका वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्‍या जाहीरातीमध्‍ये मोदी यांना विवेकानंद यांच्‍यासारख्‍या वेशभूषेत दाखविण्‍यात आले आहे. इंग्रजी वर्तमानपत्र 'मेल टूडे'मध्‍ये यासंदर्भात वृत्त प्रकाशित झाले आहे. त्‍यानुसार एका गुजराती वर्तमानपत्रामध्‍ये ही जाहीरात प्रकाशित झाली आहे. त्‍यात दोघांना आमनेसामने दाखवुन दोघांमधील साम्‍य मांडण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात आला आहे.
विवेकानंतद यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्ता होते. या जाहीरातीत मोदी यांनी भगव्‍या रंगाची शाल आणि फेटा परिधान केला आहे. जाहीरातीमध्‍ये लिहीले आहे, 'ही भगव्‍या रंगाची नदी आहे. नदीच्‍या एका किना-यावर नरेंद्र (विवेकानंद) आणि दुस-या बाजुला नरेंद्र (मोदी) आहेत. या, आपण सर्व राष्‍ट्रवादी आणि राष्‍ट्रनिर्माणाच्‍या धारेमध्‍ये सामावून जाऊ या. एका नरेंद्रने अध्‍यात्‍माचा प्रकाश सर्वत्र पसरविला. तर दुस-या नरेंद्रने सर्वसामान्‍य माणसाला केंद्रस्‍थानी ठेवून विकासाचा प्रकाश सर्वत्र पसरविला.'
ही जाहीरात भारतीय जनता पार्टीच्‍या एका जिल्‍हाध्‍यक्षाने प्रकाशित केली आहे. कॉंग्रेसने या जाहीरातीवर आक्षेप घेतला आहे.
स्टार प्रचारक म्हणून भाजपच्या यादीत वाजपेयी, मोदी, वरुण गांधी
राहुल-सोनियांची खिल्ली उडविल्याने भडकले नरेंद्र मोदी
सोशल मीडियावर नरेंद्र मोदी लोकप्रिय नेते