आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supreme Court Issued Notice To Panjab And Bihar Police For Their Voilence

बिहार आणि पंजाबमधील पोलिस दंडेलशाहीबद्दल सुप्रीम कोर्टाची नोटीस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बिहार आणि पंजाबमधील दंडेलशाहीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत पोलिसांची हजेरी घेतली आहे. बिहारमध्ये मंगळवारी कंत्राटी शिक्षक आणि पंजाबमध्ये एक महिलेस पोलिसांनी बेदम मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयाने दोन्ही राज्यांतील पोलिसांना दंडेलशाहीबद्ल जाब विचारला असून सोमवारपर्यंत स्पष्टीकरण मागितले आहे. त्याच दिवशी याप्रकरणी सुनावणीही होणार आहे.

बुधवारी याप्रकरणी न्यायालयाने स्वत:हून या दोन्ही प्रकरणांची गंभीर दखल घेतली. नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनाची असून त्या जबाबदारीपासून त्यांना पळ काढता येणार नाही. न्यायमूर्ती जी. एस. सिंघवी आणि रंजना प्रकाश यांच्या खंडपीठासमोर बुधवारी याप्रकरणी सुनावणी झाली.अ‍ॅटर्नी जनरल जी. ई. वहानवटी आणि वरिष्ठ वकील हरीश साळवे याप्रकरणी न्यायालयास सहकार्य करणार आहेत. पंजाबमधील महिलेस मारहाणीचा मुद्दा राज्यसभेतही उपस्थित करण्यात आला होता. याप्रकरणी दोषी पोलिसांना बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली होती. काँग्रेस खासदार प्रभा ठाकूर यांनी दोषी पोलिसांना तत्काळ बडतर्फ करण्याची व त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. बहुसंख्य खासदार आणि उपसभापती पी. जे. कुरियन यांनीही या मागणीला पाठिंबा दिला होता.
काय आहेत प्रकरणे
4 मार्च रोजी पंजाबमधील पोलिसांनी तरणतारण येथे एक मुलगी आणि तिच्या पित्यास बेदम मारहाण केली होती. ट्रकचालक व त्याच्या साथीदारांकडून छेडछाडीची तक्रार करण्यासाठी ही तरुणी पोलिसांकडे गेली होती.
5 मार्च : पाटणा येथे वेतनवाढ आणि नोकरीत कायम करण्याची मागणी करण्यासाठी निदर्शने करणा-या कंत्राटी शिक्षकांना बिहार पोलिसांनी झोडपले होते. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. यात शंभरावर शिक्षक जखमी झाले होते.