आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधातील याचिका फेटाळली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली - खासदार सुप्रिया सुळे यांच्या दुहेरी नागरिकत्वावरुन दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सिंगापूर आणि भारत या दोन देशांचे नागरिकत्व असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. मृणालिनी काकडे यांनी ही याचिका दाखल केली होती. दुहेरी नागरिकत्व असलेला नागरिक संसदेचे प्रतिनिधीत्व करु शकत नाही. त्यामुळे सुप्रिया सुळे यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.
याआधी मुंबई उच्च न्यायालयानेही ही याचिका फेटाळली होती. तसेच एप्रिल महिन्यात खासदार सुळे यांच्याविरोधात परदेशातील मालमत्तेवरुन दाखल याचिकाही फेटाळण्यात आली आहे. मृणालिनी काकडे यांनीच ही याचिका दाखल केली होती. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जात त्यांनी सिंगापूर येथील मालमत्तेचा उल्लेख केला नाही असा आरोप करण्यात आला होता. मात्र, काकडे न्यायालयात पुरावे सादर करु न शकल्यामुळे उच्च न्यायालयाने त्यांची याचिका रद्दबादल ठरविली होती.
राज्याच्या राजकारणात अजिबात रस नाही: खासदार सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळेंच्या परदेशी नागरिकत्वाबाबत काकडे यांच्याकडे नाहीत पुरावे
दुहेरी नागरिकत्त्वावरुन हायकोर्टाच्या निर्णयामुळे सुप्रिया सुळे अडचणीत