आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Surenneli Case's Girl Sex Worker Congress Mp K Sudhakarna

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सूर्यनेल्ली प्रकरणातील मुलगी वेश्या : काँग्रेसचे खासदार के. सुधाकरन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सूर्यनेल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलगी ही वेश्या असल्याचे काँग्रेसचे खासदार सुधाकरन यांनी म्हटल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. महिला संघटनांनी सुधाकरन यांच्या या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.


सूर्यनेल्ली सामूहिक बलात्कारप्रकरणी राज्यसभेचे उपसभापती पी. जे. कुरिअन यांच्यावर करण्यात आलेले आरोप आणि मुख्य आरोपी धमर्राजन याच्या अटकेमुळे हे प्रकरण सध्या चर्चेत आले आहे. सुधाकरन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. सुधाकरन यांना सूर्यनेल्ली प्रकरणाबाबत पत्रकारांनी विचारले तेव्हा ते म्हणाले, ‘जिच्याबद्दल तुम्ही बोलत आहात ती व्यक्ती एखाद्या वेश्येप्रमाणे आहे. पैसे कमावण्यासाठी, महागड्या भेटवस्तूंच्या लोभापायी ती हे सर्व करत होती,’ सुधाकरन यांच्या या वक्तव्यावर लगेचच तीव्र पडसाद उमटले. सुधाकरन यांच्या या वक्तव्याचा काँग्रेससह सर्व पक्षाच्या महिला पदाधिकाºयांनी निषेध केला असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.