आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरेश कलमाडी सुटले; 9 महिन्यांनी तुरूंगाबाहेर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्यातील आरोपी आणि आयोजन समितीचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांची नऊ महिन्यांनंतर गुरुवारी जामिनावर मुक्तता झाली. त्यांच्यासोबत सहआरोपी असलेले समितीचे माजी महासंचालक व्ही. के. शर्मा यांनाही हायकोर्टाने जामीन मंजूर केला.
गेल्या 25 एप्रिलला कलमाडींना अटक करण्यात आली होती तर वर्मा 23 फेब्रुवारीपासून अटकेत होते. दोघांचीही प्रत्येकी 5 लाख रुपंयाच्या जातमुचलक्यावर मुक्तता करण्यात आली. मात्र कलमाडींना विशेष न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडता येणार नाही.
कलमाडींचा युक्तिवाद : आतापर्यंत आपल्याविरुद्ध केवळ एक आरोपपत्र दाखल झाले आहे आणि त्याची सुनावणी इतक्यात सुरू होण्याची शक्यता नाही, असा कलमाडींच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद हायकोर्टाने मान्य केला.
सीबीआयचा विरोध : सीबीआयने जामिनाला विरोध करताना विशेष न्यायालयाच्या 4 जानेवारीला
दिलेल्या आदेशाचा उल्लेख केला. दस्तऐवजाच्या पडताळणीनंतर रोज सुनावणी करण्यात येणार असल्याचे यात म्हटले होते.

प्रकरण काय?
ओमेगा या स्वीस कंपनीला टीएसआरचे (टाइम, स्कोरिंग आणि रिझल्ट) बेहिशोबी कंत्राट देण्यात आले. यात 90 कोटींचे नुकसान झाले.
मे 2011 रोजी दाखल याचिकेत सीबीआयने सुरेश कलमाडी यांना मुख्य आरोपी केले आहे.
कलमाडींशिवाय घोटाळ्यात स्वीस टायमिंग, ए.के.आर. कन्स्ट्रक्शन्स, ललित भनोत, सुरजित लाल, ए.एस.व्ही. प्रसाद, ए. जयचंद्रन, ए.के. रेड्डी आणि जे.एम. इंटरनॅशनलचे पार्टनर ए.के. मदान आणि पी.डी. आर्य हे आरोपी आहेत.
मे 2011 मध्ये विशेष कोर्टात गुन्हेगारी कट, फसवणूक आणि बनावट कागदपत्र मूळ दस्तऐवज म्हणून वापरल्याचे आरोप ठेवण्यात आले होते.