आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सत्यमेव जयते : आमिरने नाही, डॉक्टरांनीच माफी मागावी - वाचकांचाही सूर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- 'सत्यमेव जयते'च्या माध्यमातून वैद्यकीय व्यवसायातील 'गोरखधंदा' उजेडात आणल्याने अभिनेता आमिर खान विरोधात डॉक्टरांकड़ून नाराजीचा सूर निघत असला तरी divyamarathi.com च्या वाचकांनी मात्र आमिरने नव्हे तर डॉक्टरांनी माफी मागावी, असे म्हटले आहे. ९८ टक्के वाचकांनी आमिरने नव्हे तर डॉक्टर्स आणि आयएमए यांनीच माफी मागावी असे म्हटले आहे. आमिरला बालीवूडमधील वर्गही आमिरच्या बाजूने उभा राहिला आहे. आम्ही आमच्या वाचकांना विचारले होते, आमिरने सत्यमेव जयतेसारख्या सामाजिक प्रश्नांना हात घातला आहे. स्त्रीभ्रूण हत्या आणि आरोग्य सेवेत डॉक्टर्स मोठा भ्रष्टाचार करीत असल्याचे आमिरने आपल्या कार्यक्रमात दाखविले होते. वैद्यकीय व्यवसायातील वास्तव आमिरने आपल्या 'सत्यमेव जयते' या रियालिटी शोमध्ये दाखविले होते. त्यावर आमिरने डॉक्टरांना बदनाम केले असल्याचा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) केला होता. आमिरने तत्काळ डॉक्टरांची माफी मागावी, अशी मागणीही आयएमएने केली आहे. अन्यथा आमिरविरुद्ध खटला दाखल करून त्याच्या चित्रपटांवर बहिष्‍कार टाकण्यात येईल, अशी धमकी आयएमएने दिली होती.
हाच मुद्दा घेऊन आम्ही आमच्या वाचकांना बोल इंडिया बोल या सदराखाली आपले मत मागवले होते. आयएमएने घेतलेली भूमिका आपल्याला योग्य वाटते काय? या प्रकरणी डॉक्टरांनी माफी मागावी की, आमिरने? असा प्रश्न आम्ही वाचकांना विचारला होता. त्यावर वाचकांनी आमिरने घेतलेली भूमिका योग्य असून वैद्यकीय व्यवसायात सामान्यांची मोठी लूट होत असल्याचे म्हटले आहे.
आमिर खानबाबत आयएमएने घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी सांगितले होते. ते म्हणाले होते की, 27 मे रोजी टीव्हीवर प्रसारित झालेल्या कार्यक्रमात काही डॉक्टरांचा अप्रामाणिकपणा उघड झाला होता. कार्यक्रमात सहभागी झालेले मेडिकल काउंसिल ऑफ इंडियाचे प्रमुख के. के. तलवार यांनीही ते मान्य केले होते.
अभय वैद्य नावाच्या एका पत्रकाराने आपल्या ब्लॉगवर लिहिले आहे की, डॉक्टरांकडून रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी दिशाभूल तसेच आर्थिक फसवणूक आता काही नवीन गोष्‍ट राहिलेली नाही. पैशासाठी काही डॉक्टर रूग्णांच्या आरोग्याचे रक्षक होण्‍याऐवजी भक्षकच होत असल्याचे दिसत आहे. एका डॉक्टरमुळे सर्वच डॉक्टर बदनाम होत आहे. वैद्यकीय व्यवसायातील डॉक्टरांचा हा अप्रामाणिकपणा पाहून एका डॉक्टरांनी वैद्यकीय व्यवसायाला 'रामराम' ठोकला होता.
सत्‍यमेव जयते: आमिरने फाडला \'ऑनर किलिंग\'चा बुरखा
\'सत्यमेव जयते\'व आमिर खानवर भडकले डॉक्टर्स
सत्यमेव जयते आणि लैंगिक शोषण झालेल्यांचे दुःख (छायाचित्र)