आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीडित तरुणीची कुरियनविरोधातील याचिका फेटाळली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इडुक्की (केरळ)- सूर्यनेल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणात पीडित मुलीने राज्य सभेचे उपसभापती पी.जे. कुरियन यांच्या विरोधात दाखल केलेली याचिका स्थानिक न्यायालयाने फेटाळून लावली. काँग्रेस नेत्याविरुद्ध फेरतपास करण्याची विनंती त्यात करण्यात आली होती. कुरियन यांचा या प्रकरणात सहभाग आहे. त्याविषयीचा तपास नव्याने करण्यात यावा. त्यासाठी न्यायालयाने आदेश द्यावेत, अशी विनंती पीडिताने याचिकेद्वारे केली होती; परंतु या मुद्द्यावर अगोदरच तपास करण्यात आला आहे. नव्याने तपास करण्याची गरज दिसून येत नसल्याचे स्पष्ट करत प्रथम वर्ग दंडाधिकार्‍यांनी ही मागणी फेटाळून लावली. खटल्यातील तिसर्‍या क्रमांकाचा आरोपी धर्मराजनने कुरियन यांच्या सहभाग असल्याचे आपल्या जबाबात म्हटले होते. पीरूमाडे येथील विश्रामगृहात सदर मुलीवर कुरियन यांनी अत्याचार केल्याचा आरोप धर्मराजनने केला होता. गेल्या महिन्यात एका मल्याळम टीव्ही वाहिनीवर धर्मराजनने अचानक हजेरी लावून हा आरोप केला होता.