आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदे लोकसभेत सभागृह नेते

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची लोकसभेत सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली.
संसदीय कामकाजमंत्री पवनकुमार बन्सल यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. प्रणव मुखर्जी राष्ट्रपती झाल्यानंतर हे पद रिक्त होते. महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदासह विविध मंत्रालयांचे काम पाहिलेले शिंदे यांनी केंद्रात तसेच पक्षात अनेक जबाबदा-या पेलल्या आहेत. आंध्रचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. नुकतेच त्यांच्याकडे उर्जा खात्याऐवजी गृह खात्याचे मंत्रिपद सोपविण्यात आले आहे.
ग्रीडचे काम कौतुकास्पद: सुशीलकुमार शिंदे यांचे टीकाकारांना चोख उत्तर
गांधी घराणे दलितांना विसरलेले नाही- गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे
सुशीलकुमार शिंदेंकडे गृह खाते, पी. चिदंबरम नवे अर्थमंत्री