आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushilkumar Shinde Claims That Rss And Bjp Provoking Hindu Terrorism

\'हिंदू\' दहशतवादावरुन शिंदेंचे घुमजाव, दिग्विजय सिंहांचा अडवाणींवर निशाणा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- हिंदू दहशतवादाच्‍या मुद्यावरुन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी घुमजाव केले आहे. तर कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिह यांनी भाजपचे ज्‍येष्‍ठ नेते लालकृष्‍ण अडवाणी यांच्‍यावरच हल्‍लाबोल केला आहे.

सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदू दहशतवादाच्‍या मुद्यावरुन सारवासारव करताना, हिंदू दहशतवाद नव्‍हे तर भगव्‍या दहशतवादाबद्दल बोललो होतो, असे स्‍पष्‍ट केले. शिंदे यांच्‍या स्‍पष्‍टीकरणावरुन भाजपचे समाधान झालेले नसून सोनिया गांधींनी याबाबत माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

दुसरीकडे दिग्विजय सिंह यांनी अडवाणी यांच्‍यावर निशाणा साधत दिग्विजय सिंह म्‍हणाले, साध्‍वी प्रज्ञा सिह, कर्नल पुरोहित यांच्‍यासारख्‍या दहशतवाद्यांची बाजू मांडण्‍यासाठी पंतप्रधानांकडे गेले होते. त्‍यांच्‍यासोबत सुषमा स्‍वराजही होत्‍या. खरे तर भाजपनेच यासाठी देशवासीयांची माफी मागितली पाहिजे.

तत्‍पुर्वी, सुशीलकुमार शिंदे यांनी राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ आणि भाजपवर हिंदू दहशतवाद पसरविण्‍याचा खळबळजनक आरोप केला होता. या संघटनांच्‍या शिबिरांमध्‍ये हिंदू दहशतवादाचे प्रशिक्षण देण्‍यात येते, असा दावा शिंदे यांनी केला.

जयपूर येथे कॉंग्रेसच्‍या चिंतन शिबिरात बोलताना शिंदे म्‍हणाले, माझ्याकडे एक गोपनीय अहवाल आला आहे. त्‍यानुसार, भाजप आणि आरएसएसच्‍या शिबिरांमध्‍ये हिंदू दहशतवादाला खतपाणी घालण्‍यासाठी प्रशिक्षण दिले जाते. समझौता ब्‍लास्‍ट, मालेगाव ब्‍लास्‍ट आणि मक्‍का मशिदीमध्‍ये झालेल्‍या ब्‍लास्‍टमध्‍ये एक गोष्‍ट आढळते ती म्‍हणजे त्‍यात अल्‍पसंख्‍यांकांना लक्ष करण्‍यात आले होते.

शिंदे यांच्‍या वक्तव्‍यावर भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे. भाजपचे प्रवक्ता शाहनवाझ हुसैन यांनी सांगितले की, गृहमंत्र्यांचे वक्तव्‍य अतिशय बेजबाबदारपणाचे आहे. ते भाजपबाबत अपप्रचार करीत आहेत. असे वक्तव्‍य देशाच्‍या हितचे नाही.

आरएसएसचे प्रवक्ते मनमोहन वैद्य यांनी शिंदेंच्‍या वक्तव्‍याबाबत सांगितले की, कोणत्‍याही धर्माला दहशतवादासोबत जोडणे योग्‍य नाही. दहशतवाद, दहशतवादच असतो. तो हिंदू किंवा इतर कोणी नसतो. जिहादी दहशवादावर नियंत्रण आणण्‍यात अपयश आल्‍यामुळे कॉंग्रेस अशा पद्धतीचा प्रचार करीत आहे.