आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushilkumar Shinde Explanation Detail On Afzal Death Case

अफझलच्या कुटुंबियांना फाशीची माहिती दिली होती- शिंदेंचे स्पष्टीकरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- संसदेवरील हल्ल्यातील मुख्य सूत्रधार अफझल गुरुला फाशी देण्यात येणार असल्याची त्याच्या कुटुंबियांना स्पीडपोस्टद्वारे देण्यात आली होती, असे स्पष्टीकरण गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिले. तसेच अफझलच्या कुटुंबियांकडून मृतदेहाची मागणी होत असून त्याबाबत विचार केला जाईल, असेही शिंदे यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.

अफझल गुरुला शनिवारी सकाळी आठ वाजता दिल्लीतील तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आली. त्यानंतर अफझलच्या कुटुंबियांनी त्याला फाशी देण्यात येणार असल्याची माहिती सरकारने आम्हाला कळविली नव्हती, असा आरोप केला होता. तसेच अफझलचा तिहारमध्ये दफन केलेला मृतदेह परत करावा, अशी मागणीही त्याच्या भावाने केली आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनीही अफझलला फाशी द्यायला नको होती, असे सांगत काश्मीर खो-यातील लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न चालवला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज सायंकाळी सव्वाचार वाजता पत्रकार परिषद घेतली व अफझल गुरुच्या फाशीबाबत स्पष्टीकरण दिले.

शिंदे म्हणाले, अफझल गुरुला फाशी देण्यात येणार असल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांना 7 फेब्रुवारीला स्पीडपोस्टाद्वारे कळविली होती. तसेच याबाबतची माहिती जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला व तेथील राज्याचे पोलिस महासंचालक यांना 8 फेब्रुवारीला याबाबतची माहिती देऊन कायदा व सुरक्षा व्यवस्था करण्याची सूचना केली होती. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. सरकारने हे प्रकरण योग्य पद्धतीने हाताळले असून, त्याला कायद्याच्या प्रक्रियेद्वारे फाशी देण्यात आली. तसेच फाशीचा पुढला नंबर कोणाचा या प्रश्न विचारताच शिंदेंना हसू आवरता आले नाही. तसेच याबाबत आताच सांगता येणार नाही, असे उत्तर दिले.

सोपोरमध्ये तणाव, दोघांचा मृत्यू- अफझल गुरुला फाशी दिल्याच्या निषेधार्थ काश्मीर खो-यात तणाव कामय असून, आतापर्यंत दोन जणांना मृत्यू झाला आहे. काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या घटना सुरुच असून, तेथे कर्फ्यू कायम आहे.