आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swami Agnivesh Defends Hostel Warden Uma Poddar At West Bengal, Vishwabharati University Hostel

मूत्र पाजणार्‍या वॉर्डनच्या पाठीशी स्वामी अग्निवेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पश्चिम बंगालमधील 'विश्वभारती विद्यापीठा'शी संलग्न असलेल्या हॉस्टेलमधील निलंबित वॉर्डनची वकीली करणारे स्वाम‍ी अग्निवेश अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. भगत सिंग क्रांती सेनेने स्वामी अग्निवेश यांनी 24 तासांचे अल्टीमेटम दिले आहे. त्यांनी माफी मागावी अन्यथा परिणामांना सामोरे जावे, असाही इशारा दिला आहे. परंतु अग्निवेश आपल्या मतावर ठाम आहेत.
'विश्वभारती विद्यापीठा'शी संलग्न असलेल्या करबी गर्ल्स हॉस्टेलमधील वॉर्डन उमा पोद्दार हिने विद्यार्थिनीला स्वमूत्र पाजल्याची घृणास्पद शिक्षा दिली होती. आता या घटनेला वेगळे वळण मिळाले आहे. याप्रकरणी वॉर्डन पोद्दार हिला निलंबित केले होते. संपूर्ण देशात या घटनाबाबत संताप व्यक्त होत असताना मात्र स्वामी अग्निवेश यांनी वॉर्डनच्या पाठीशी उभे राहीले आहे. वॉर्डनने दिलेल्या शुल्लक शिक्षेचा संबंधित विद्यार्थिनीचे पालक आणि प्रसारमाध्यमांनी चुकीचा अर्थ घेतल्याचेही यांनी सांगितले होते. घरात ज्याप्रमाणे आई-वडिल मुलांना सल्ला देतात. काही प्रसंगी रागवतातही, अगदी तशाच पद्धतीने हॉस्टेलमधील वॉर्डनने संबंधित विद्यार्थिनीला सल्ला दिला असेल. परंतु मीडियाने या घटनेला 'घृणास्पद' म्हणून प्रसिद्धी दिली, असे स्वामी अग्निवेश यांनी 'भास्कर डॉट कॉम'शी बोलताना सांगितले. देशात यापेक्षा अनेक गंभीर समस्या आहेत, त्यांच्यावर मिडियाने चर्चा केली पाहिजे, असेही स्वामी यावेळी म्हणाले होते.
आपले मत...
आपण स्वामी अग्निवेश यांच्या मताशी सहमत आहात काय? आपले मत आपण खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकतात.
शांतीनिकेतनमध्ये हॉस्टेलच्या वॉर्डनने विद्यार्थिनीला पाजले मूत्र!
स्वामी अग्निवेश यांना न्यायालयाचा दिलासा
'अग्निवेश यांनी स्वत:ला ‘स्वामी’ म्हणणे सोडून द्यावे'