आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूत्रप्राशन करणे पारंपरिक इलाज : स्वामी अग्निवेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पश्चिम बंगालच्या विश्वभारती विद्यापीठामधील इयत्ता पाचवीतील मुलीला मूत्र चाटायला भाग पाडल्याप्रकरणात सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांच्या वक्तव्यामुळे वाद उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुलांनी अंथरून ओले करू नये, यासाठी त्यांना मूत्र प्यायला देणे पारंपरिक इलाज आहे, असे अग्निवेश यांचे म्हणणे आहे.
वसतिगृहाच्या वॉर्डन उमा पोद्दार यांनी मुलीची अंथरूण ओले करण्याची सवय मोडण्यासाठी ओले अंथरूण चाटण्यास सांगितले होते. त्यांच्या सूचनेवर एवढा गोंधळ करण्याचे कारण नाही, असे अग्निवेश यांनी म्हटले आहे. शनिवारी विश्वभारती विद्यापीठाच्या वसतिगृहात ही घटना घडली. तारुण्यापर्यंत अंथरूण ओले करण्याची आपल्याला सवय होती. यातून सुटका करण्यासाठी शिवांबूची मदत घेतली, असे अग्निवेश यांनी म्हटले आहे. आणीबाणीच्या काळात अंबाला तुरुंगात असताना शिवांबू पद्धती स्वीकारली होती, असे ते म्हणाले. अनेकांना हा प्रकार घृणास्पद वाटत असेल, परंतु मी त्याबाबत अनेक महिने अभ्यास केला. पुस्तकांमध्ये त्यासंबंधी वाचले आणि त्याचा स्वीकार केला.
अग्निवेश यांनी माजी पंतप्रधान मोरारजी देसाई, माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री देवीलाल यांचे उदाहरण या संदर्भात दिले. वॉर्डन उमा पोद्दार यांना सोमवारी अटक करण्यात आली. पंतप्रधान कार्यालयाने याबाबतचा अहवाल मागितला आहे.