Home »National »Delhi» Swami Vivekanand Death

'स्वामी विवेकानंदांना होते 31 आजार; त्यामुळेच 39 व्या वर्षी निधन'

दिव्य मराठी नेटवर्क | Jan 07, 2013, 15:02 PM IST

  • 'स्वामी विवेकानंदांना होते 31 आजार; त्यामुळेच 39 व्या वर्षी निधन'
कोलकाता- स्वामी विवेकानंदांचे निधन वेगवेगळ्या गंभीर 31 आजारांमुळे झाल्याचे प्रसिद्ध बांगला लेखक शंकर यांनी आपल्या पुस्तकात लिहून खळबळ उडवून दिली आहे. 'द माँक अँज मॅन' चे प्रसिद्ध बंगाली लेखक शंकर यांनी विवेकानंद यांच्या आजाराची यादी मांडली आहे. आरोग्याच्या पातळीवर त्यांचे अल्पायू अनेक आजारांचे घर बनले होते. त्यांना वयाच्या 39 व्या वर्षी 31 आजार होते.
'द माँक एज मॅन' या आपल्या पुस्तकात शंकर यांनी म्हटले आहे की, विवेकानंदांना निद्रानाश, मलेरिया, मायग्रेन, डायबेटिससह हृदय, किडनी आणि लिव्हरशी संबंधित 31 आजार होते. त्यामुळेच स्वामींचे वयाच्या अवघ्या 39 व्या वर्षी निधन झाले असा दावा शंकर यांनी केला आहे. 'शरीरं व्याधीमंदीरम'अशा संस्कृत शब्दांत शंकर यांनी त्यांच्या व्याधीग्रस्त शरीराचे वर्णन केले आहे.
भारतीय अध्यात्माचा जगभरात प्रसार करणारे स्वामी विवेकानंद यांना आयुष्य जेमतेम 39 वर्षेच लाभले होते.

Next Article

Recommended