आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोकरीसाठी टॅलेंट स्टॉक एक्स्चेंज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - उद्योगविश्वातील उलाढालीसाठी शेअर बाजाराची संकल्पना असित्वात आली आता योग्य उमेदवार आणि योग्य नोकरीसाठी खास ‘टॅलेंट स्टॉक एक्स्चेंज’ एका मनुष्यबळ विकास कंपनीची स्थापना करण्यात येणार आहे. कुशल कामगार, प्रोफेशनल्सच्या मागणी आणि पुरवठ्यातील तफावत दूर करण्यासाठी पीपलस्ट्राँग या कंपनीचे टॅलेंट स्टॉक एक्स्चेंज डिसेंबरात सुरू होत आहे.
पीपलस्ट्राँग कंपनीचे विद्यमान घडीला नोकिया, एलअँडटी, एसआरएफ, मारुती सुझुकी, मायक्रोसॉफ्ट, झॅपर, नोकिया सिमेन्स नेटवर्क अशा आघाडीच्या कंपन्यांच्या एकूण 40 हजार नोक-या आहेत.पीपलस्ट्राँगशी संलग्न नोंदणीकृत प्लेसमेंट कंपन्यांकडून येणा-या उमेदवारांची माहिती एक्सचेंजवर टाकण्यात येईल. या उमेदवारांच्या माहितीची छाननी करून कंपनी निवड करेल. ज्या उमेदवारांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत, त्यांनाही कंपनीकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यांच्यातील कच्चे दुवे हेरून त्यावर मात करण्यासाठी सल्ला देण्यात येईल