आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tamil Nadu Bans Screening Of \'Vishwaroopam\' For 2 Weeks

\'विश्वरुपम\'वर तमिळनाडूमध्ये बंदी; कमल हसन न्यायालयात जाणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - अभिनेता कमल हसनचा आगामी चित्रपट 'विश्वरुपम' वर तमिळनाडू सरकारने प्रदर्शनापूर्वीच बंदी घातली आहे. जवळपास २० मुस्लिम संघटनांनी या चित्रपटाला तीव्र विरोध केला आहे. त्यांचा आरोप आहे की, या चित्रपटात मुस्लिमांचे नकारात्मक चित्रण करण्यात आले आहे. त्यामुळे राज्य सरकारने जिल्हाधिका-यांना या चित्रपटावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. त्यासोबतच कायदा आणि सुव्यवस्था राखली जाईल याकडे लक्ष देण्याच्याही सुचना देण्यात आल्या आहेत.

चित्रपटात मुस्लिम समाजाची निंदा केली नसल्याचे कमल हसन यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, विरोधी संघटना त्यांचे ऐकण्यास तयार नाहीत. चित्रपटावरील बंदीने कमल हसन निराश झाले आहेत. हा सांस्कृतिक दहशतवाद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दक्षिणेत २५ जानेवारी पासून हा चित्रपट प्रदर्शित होणार होता आणि हिंदीमध्ये एक फेब्रुवारीला रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. चित्रपट प्रदर्शनापू्र्वीच वादात अडकल्याने कमल हसन यांनी आता न्यायालयाचे दार ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या बंदी विरोधात ते न्यायालयात जाणार आहेत.