आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tamilnadu Releases 2.44 Tmc Water Supreme Court Order To Karnatka

तामिळनाडूला 2.44 टीएमसी पाणी सोडा - सर्वोच्च न्यायालयाचे कर्नाटकला निर्देश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली - तामिळनाडूला कावेरी नदीचे 2.44 टीएमसी पाणी सोडण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकला दिले आहेत. तामिळनाडूची 12 टीएमसीची मागणी मात्र नाकारण्यात आली. न्या. आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने तीन दिवसांपूर्वी 2 टीएमसी पाणी सोडण्याचे निर्देश दिले होते. केंद्रीय जल आयोगाच्या (सीडब्ल्यूसी) शिफारशीनंतर गुरुवारी त्यात 0.44 टीएमसी पाण्याची वाढ करण्यात आली.