आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीहून फोन.. चुकीचे उत्तर.. तिकीट कॅन्सल!

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ही काही कुठल्या निवडणुकीची वा राजकीय पक्षाची तिकीटवाटपाची प्रक्रिया नाही, तर तो तत्काळ तिकीट आरक्षण करणार्‍यांना दिलेला इशारा आहे. रेल्वेच्या आयआरसीटीसी वेबसाइटवर तिकीट बुक करणारे प्रवासी, दलालांना प्रशासनाने दिलेला इशारा आहे. सकाळी आठ ते सव्वाआठ या काळात तत्काळ तिकिटाचे आरक्षण करणार्‍यांना काही वेळानंतर एक फोन येऊ शकतो. तो फोन दिल्लीच्या आयआरसीटीसी कॉल सेंटरवरून असेल आणि विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर चुकले तर तुमचे तिकीट रद्द होऊ शकते.

तत्काळ आरक्षणाचा काळाबाजार रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांपैकी तो एक भाग आहे. तिकीट बुक करताना देण्यात आलेला रजिस्टर्ड मोबाइल नंबर किंवा देण्यात आलेल्या एसएमएस क्रमांकावर फोन येईल. फोनवर तुम्हाला प्रवासासंदर्भात सर्व तपशील विचारण्यात येईल. जर माहिती चुकीची निघाली तर तुमचे तिकीट ‘तत्काळ’ रद्द होईल. एवढेच नव्हे, तर तुमच्याविरोधात कायदेशीर कारवाईदेखील होऊ शकते. आयआरसीटीसीच्या क्षेत्रीय अधिकार्‍यांनी सांगितले की, व्हेरिफिकेशन कॉल प्रवाशांना कोणत्याही क्षणी यऊ शकतो. कुठल्या एजंटाने काळ्या बाजारात विकण्यासाठी तिकीट बुक केले असेल तर कॉल सेंटरवरून विचारलेल्या प्रश्नांना तो योग्य प्रकारे उत्तर देऊ शकणार नाही.

सूत्रांनी सांगितले की, तत्काळ तिकीट आरक्षणात सर्वात जास्त काळाबाजार पहिल्या 15 मिनिटांतच होतो. त्यामुळे वरील उपाययोजना करण्यात आली आहे. 10 जुलैपासून तत्काळ तिकीट आरक्षणाचा अवधी सकाळी 19 वाजता करण्यात आला आहे. आयआरसीटीसीने सूचना अलर्ट स्वरूपात वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहे. अर्थात या योजनेची अंमलबजावणी योग्य प्रकारे होईल की नाही याबद्दल अधिकारीच साशंक आहेत. तत्काळ योजनेअंतर्गत दरदिवशी हजारो तिकिटांचे बुकिंग होते. तेवढय़ा सगळ्यांची नियमित उलट तपासणी करणे कठीण असल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

या प्रश्नांची द्यावी लागतील उत्तरे

युजर आयडी : ज्या युजर आयडीद्वारे तिकीट बुक करण्यात आले आहे तो सांगावा लागेल. तिकीट विकले असेल तर युजर आयडी सांगताना अडचण येऊ शकते.
3पीनएनआर नंबर : तिकिटाचा पीएनआर नंबर काय आहे, प्रवास कुठून कुठपर्यंत करणार आहात?
प्रवाशांची माहिती : तिकिटावर कोण प्रवास करणार आहे, त्यांचे वय काय आहे, त्यांना कोणता बर्थ मिळाला आहे?
मोबाइल नंबर : स्वत:चा तसेच सहप्रवाशाचा मोबाइल क्रमांक सांगा.
‘वेटिंग लिस्ट’पासून रेल्वे प्रवाशांची सुटका
‘त्यांनी’ आयुष्यात पहिल्यांदाच रेल्वे पाहिली तेव्हा...