आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- 25 जुलैपासून उपोषणास बसणा-या टीम अण्णांना दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. दिल्ली पोलिसांनी सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या निकालांचा तसेच गेल्यावर्षी जून महिन्यात रामलीला मैदानावर रामदेव बाबांबरोबर झालेल्या प्रकरणांचा हवाला देत परवानगी नाकारली आहे.
टीम अण्णांनी दिल्ली पोलिसांकडे जंतर-मंतरवर 25 जुलै ते 8 ऑगस्टपर्यंत उपोषणाची परवानगी मागितली होती. टीम अण्णांच्या उपोषणावेळी संसदेचे पावसाळी अधिवेशन आहे. या काळात देशातील वेगवेगळया संघटना जंतर-मंतरवर येऊन विरोध प्रदर्शन आणि धरणे आंदोलन करीत असतात. तसेच जंतर-मंतर हे छोटे मैदान आहे. मैदानावर गडबड होऊन चेंगराचेंगरी झाल्यास पोलिसांना लोकांना मदत करण्यास कठीण जाईल. त्यातच पोलिसांना या संघटनांना जागा उपलब्ध करून द्यावयाची आहे. त्यामुळे टीम अण्णांना बेमूदत उपोषणास परवानगी देऊ शकत नसल्याचे पोलिसांनी टीम अण्णांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
दिल्ली पोलिसांनी टीम अण्णांना चर्चेसाठी बोलावले आहे. टीम अण्णांना जर 25 जुलै ते 8 ऑगस्टपर्यंत उपोषणास परवानगी न मिळाल्यास उपोषणाचा कार्यक्रम बदलून देशभर जेलभरो आंदोलन करण्यात येईल असे, टीम अण्णांचे सदस्य नीरज कुमार यांनी भास्कर डॉट कॉमशी बोलताना म्हटले.
प्रणव मुखर्जी \'भ्रष्टाचारी\', टीम अण्णांचा आरोप
टीम अण्णाचा रामदेव बाबांसोबत एकतर्फी तह
टीम अण्णाशी मतभेद : टीम मुंबईने दिली वेगळी होण्याची धमकी
रामदेव बाबा व टीम अण्णांत मतभेद; अरविंद केजरीवाल स्टेज सोडून गेले
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.