आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Team Anna In Politics, Media Poll, Readers Gives Thumbs

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्वे : टीम अण्णाच्या राजकारणात येण्याच्या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- टीम अण्णा आज सायंकाळी पाच वाजता उपोषण सोडणार आहे. त्यासाठी विविध मान्यवर जंतरमंतरच्या मंचावर दाखल झाले आहेत. माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांच्या उपस्थितीत टीम अण्णा उपोषण सोडणार आहेत. दरम्यान, टीम अण्णाचे सदस्य डॉ. संजीव छिब्बर यांनी टीमचे सदस्य अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप केला आहे की, आंदोलनाच्या पैशातून केजरीवाल निवडणूक लढवू इच्छित आहेत. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना, छिब्बर यांनी आरोप केला की, केजरीवाल आणि कंपनी जनतेला फसवत आहे. जंतरमंतरवर केजरीवाल यांनी आता केलेले आंदोलन म्हणजे देशाची केलेली चेष्टा आहे व जनतेची फसवणूक आहे.
केजरीवाल यांनी राजकारणात येण्यासाठी संपूर्ण नियोजन केले आहे. त्यासाठीच त्यांनी जनलोकपाल आंदोलन उभा करुन त्या माध्यमातून भरपूर पैसा उभा केला. आता तोच पैसा घेऊन ते राजकारणात उतरणार आहेत. डॉ. छिब्बर म्हणाले, टीम अण्णा जर राजकारणात व निवडणूकीत उतरली तर मी माझे उमेदवार उभे करेन. त्यासाठी मी पैसा खर्च करेन. छिब्बर हे अण्णांच्या आंदोलनात प्रथमपासूनच सक्रिय आहेत. अण्णा हजारे हा संत माणूस आहे मात्र त्यांना बदनाम केले गेले आहे.
टीम अण्णा आज उपोषण सोडून देशाला एक राजकीय पर्याय देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात असले तरी, राजकीय पक्ष काढण्याबाबत अजून काहीही निर्णय झालेला नाही, असे मत टीम अण्णाचे सदस्य मनिश सिसोदिया यांनी म्हटले आहे. दरम्यान, यावरुन टीम अण्णांत मतभेद असल्याचे बोलले जात आहे. काहीजण पक्ष काढावा, या मताचे आहेत. तर, काही जण पक्ष काढणे सोपे आहे पण तो चालविणे अवघड असल्याचे सांगत आणखी थोडा विचार करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. टीम अण्णाचे सदस्य गोपाल राय यांनी निवडणूकीत उतरण्याबाबत स्पष्ट मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, २०१४च्या जर आपले लोक निवडून आले तर सध्याच्या सरकारमधील १५ भ्रष्ट मंत्री जेलमध्ये असतील. तर, कुमार विश्वास यांचा पक्ष काढण्याला विरोध आहे. त्यामुळे टीम अण्णा काय निर्णय याकडे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे मजबूत लोकपालसाठी गेल्या दीड वर्षापासून सुरु असलेल्या या जनआंदोलनाचा यातून मृत्यू होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. टीम अण्णा कोणत्याही मागण्याशिवाय आज उपोषण सोडत आहे.
टीम अण्णाने देशातील जनतेला विचारले आहे की, काय आम्ही राजकारणात आले पाहिजे?. याबाबत दैनिक भास्कर समुहाने जेव्हा आपल्या वाचकांना विचारले तेव्हा ९० टक्के वाचकांनी टीम अण्णांनी राजकारणात यावे, असे म्हटले आहे.
भ्रष्टाचाराविरुद्ध उपोषणाचा मार्ग सोडून... अण्णा राजकारणात
टीम अण्णा आज सायंकाळी उपोषण सोडणार; राजकीय पर्यायाचा विचार सुरु
टीम अण्णाने राजकारणात उतरावे का? टीमने मागितली जनतेतून मते...