आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीम अण्णाचा रामदेव बाबांसोबत एकतर्फी तह

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोएडा- भ्रष्टाचाराच्या मुद्यावरील आंदोलनात योगगुरू बाबा रामदेव यांच्याशी झालेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर टीम अण्णाने सोमवारी रामदेवांशी जुळवून घेण्यासाठी पुढाकार घेत 9 ऑगस्ट पासून सुरू होणा-या योगगुरूच्या आंदोलनात सहभागी होण्याची आणि 25 जुलैपासून सुरू होणा-या टीम अण्णांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी बाबा रामदेवांना निमंत्रित करण्याची घोषणा केली.
आपल्या व्यासपीठावरून पंतप्रधानांसह कोणत्याही राजकीय नेत्याचे वैयक्तिक नाव घेऊन आरोप करायचे नाही, असे सांगत बाबा रामदेव यांनी टीम अण्णाचे सदस्य अरविंद केजरीवाल यांना जंतरमंतरवर रविवारी झालेल्या आंदोलनाच्या वेळी फटकारले होते. त्यानंतर रामदेव आणि अण्णा हजारे यांच्या या संयुक्त एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाचे व्यासपीठ सोडून केजरीवाल तात्काळ निघून गेले होते आणि दोघांमधील मतभेद चव्हाट्यावर आले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण निघून गेल्याचे स्पष्टीकरण स्वत: केजरीवाल यांनी नंतर दिले मात्र या आंदोलनापेक्षा टीम अण्णा आणि बाबा रामदेव यांच्यातील मतभेदांचीच जास्त चर्चा होत राहिली. टीम अण्णांच्या कोअर समितीच्या दिवसभर चाललेल्या बैठकीनंतर बाबा रामदेव यांच्या 9 ऑगस्टच्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या बैठकीला अण्णा हजारे, संतोष हेगडे, केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि किरण बेदी यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. 25 जुलै रोजीच्या आंदोलनात बाबा रामदेव यांना निमंत्रित करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आल्याचे बैठकीनंतर हजारे यांनी पत्रकारांना सांगितले. बाबा रामदेव यांच्या 9 ऑगस्टपासून सुरू होणा-या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णयही आम्ही एकमतानेच घेतला. त्यांच्या आंदोलनात आम्ही आणि आमच्या आंदोलनात ते सहभागी होतील, असेही हजारे यांनी सांगितले.
प्रकृतीच्या कारणामुळे 25 जुलै रोजी अण्णा हजारे उपोषणाला बसणार नाहीत मात्र ते आंदोलनाला हजर राहातील, असे केजरीवाल यांनी सांगितले. पंतप्रधान मनमोहनसिंग आणि अन्य 14 मंत्र्याविरूद्ध टीम अण्णाने केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत जनजागृती करण्यासाठी टीमचे सदस्य मंगळवारपासून देशव्यापी दौ-यावर निघणार आहेत, असे हजारे म्हणाले. पंतप्रधान आणि अन्य लोकांची नावे घेण्याबाबत बाबा रामदेव यांनी केजरीवालांना फटकारल्याबद्दल विचारले असता वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मते असतात, अशी सारवासारव हजारे यांनी केली.

नाही नाही म्हणत पुन्हा मतभेदच!
भ्रष्टाचार आणि काळ्यापैश्याच्या मुद्यांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणून कोणाचेही वैयक्तिक नाव घेऊन टीका करायची नाही, असा शिष्टाचार निश्चित करण्यात आला होता, असे स्पष्टीकरण बाबा रामदेव यांनी जंतरमंतरवरच दिले होते. तर चळवळ सुरू ठेवण्यासाठी पंतप्रधानांसह अन्य भ्रष्ट नेत्यांची नावे घेणे आवश्यक असल्याचा केजरीवालांचा आग्रह आहे. कोणताही शिष्टाचार ठरवण्यात आलेला नव्हता, असे सांगत केजरीवाल यांनी सोमवारी बाबा रामदेव यांचा दावा खोडून काढला.

हे काय लग्न आहे?
टीम अण्णाच्या निर्णय प्रक्रियेत आपणास सहभागी करून घेतले जात नाही, असा सूर अण्णा हजारे यांच्या मुंबईतील कार्यकर्त्यांमध्ये जोर धरू लागला आहे. त्याबाबत विचारले असता हजारे म्हणाले की, त्यांना निमंत्रणे द्यायला हे काय लग्न आहे काय? हे राष्ट्रीय काम आहे.
भाजपचे योगगुरु रामदेवबाबांपुढे \'लोटांगण\', केजरीवाल भूमिकेवर ठाम
रामदेव बाबा व टीम अण्णांत मतभेद; अरविंद केजरीवाल स्टेज सोडून गेले
भ्रष्‍ट मंत्र्यांविरुद्ध टीम अण्‍णा आक्रमक, पंतप्रधानांवरही आरोप