आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशियाई नेमबाजी स्पर्धेत औरंगाबादचे ‘तेज’ तळपले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोहा - दोहा येथील आशियाई नेमबाजी स्पर्धेत औरंगाबादचे ‘तेज’ तळपले. औरंगाबादची नेमबाज तेजस्विनी मनोज मुळे हिने सांघिक गटात रौप्यपदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली. तेजस्विनीने 50 मी. स्पोर्ट रायफल प्रोन प्रकारात एलिझाबेथ आणि अंजुमसोबत सांघिक गटात दुसरे स्थान मिळवून मोठे यश मिळविले. एअर पिस्टलमध्ये भारताच्या अनुराज सिंह, श्वेता चौधरी यांनी सांघिकमध्ये सुवर्ण पटकावले. तसेच 50 मी. प्रोनमध्ये राजकुमारी वैयक्तिक सुवर्णची मानकरी ठरली.
तेजस्विनी, एलिझाबेथ, अंजुम यांच्या संघाने 1800 पैकी सर्वाधिक 1736 गुण मिळवत भारताला रौप्यपदक जिंकून दिले. चीनच्या संघाने सुवर्णमध्ये पटकावले. याच वेळी वैयक्तिक स्पर्धेत तेजस्विनीचे कास्यपदक एका गुणाच्या अंतराने हुकले.