आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घुसखोर दहशतवादी जम्मूत दडून बसले ; सुरक्षा यंत्रणेला सतर्क राहण्याचा आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली - पाकिस्तान सीमेवर घुसखोरी केलेले दहशतवादी जम्मू व परिसरात दडून बसले आहेत, धक्कादायक माहिती गुप्तचर सूत्रांनी दिली आहे. गुप्तचरांनी ही माहिती गृहमंत्रालय व वरिष्ठ लष्करी अधिका-यांना दिली आहे. काश्मीरच्या खो-यातून पाकिस्तानात करण्यात आलेल्या फोनच्या कॉल डिटेल्सवरून ही माहिती मिळाल्यामुळे लष्कर तसेच सुरक्षा यंत्रणेला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

सूत्रांनी सांगितले की, जम्मू तसेच काश्मीर खो-यात घातपात घडवण्याचा त्यांचा कट असावा. याशिवाय देशातील काही इतर भागांतही ते घातपात घडवून शकतात. त्या दृष्टीने राजधानी दिल्ली व मुंबई हे त्यांचे टार्गेट असू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. सूत्रांनी सांगितले की, जम्मूच्या सीमावर्ती भागात लष्कराच्या तुकडीवरही हल्ला करू शकतात. ही माहिती गृहमंत्रालयास कळवण्यात आली आहे.