आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा आहे आयएमचा ‘दहशतनामा’; भारतात घातपात घडवणे हाच उद्देश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- हैदराबाद बॉम्बस्फोटांनंतर हे स्पष्ट झाले आहे की, इंडियन मुजाहिदीन (आयएम) देशात सक्रिय असून पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय व लष्कर - ए-तोयबासारख्या दहशतवादी संघटनांची कटकारस्थाने व मनसुबे प्रत्यक्षात उतरवणे हेच आयएमचे मुख्य काम आहे. या संघटनेची निर्मिती आयएसआयच्या इशार्‍यावरून पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतात कारवाया करण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर होणारी बदनामी टाळण्यासाठी झाली आहे

इंडियन मुजाहिदीनचा मुख्य पदाधिकारी आमिर रजा खान हा दतशतवादी संघटना जैश-ए-मोहंमद, हरकत-उल-जेहादी (हुजी) व लष्कर-ए-तोयबा यासारख्या संघटनांच्या कटांना भारतात आपल्या गटाच्या माध्यमातून मूर्तरूप देत आला आहे. पाकिस्तान आणि दुबईत बसून भारतात बॉम्बस्फोट करणार्‍या आमिरचा पोलिस यंत्रणा गेल्या अनेक दिवसांपासून शोध घेत आहे. आमिर रझा खान व भाऊ आसिफची पार्श्वभूमी : दिल्ली पोलिसांनी 1995 मध्ये एका एन्काउंटरमध्ये अपहरणकर्ता दिनेश ठाकूरची हत्या केली. त्यानंतर त्यांचा सहकारी आफताब अन्सारीला पकडण्यात आले होते. तुरुंगात आफताबची ओळख आमिरचा भाऊ आसिफसोबत झाली. आसिफ त्या वेळी हिज्बुल मुजाहिदीनमध्ये होता. तुरुंगात मौलाना अजहर मसूद, उमर शेख व मुश्ताक अहमद झरगर यांनाही ते दोघे भेटले. डिसेंबर 1999 मध्ये अजहर, झरगर व उमरला कंदहारला विमान अपहरणप्रकरणी सोडावे लागले. 1999 मध्ये आफताब व आसिफ हेही तुरुंगातून सुटले. आफताब व फेब्रुवारी 2001 मध्ये पाकिस्तानला गेले. तेथे त्यांनी जैश-ए-मोहंमदचा मौलाना अजहर मसूद, झरगर, हुजीचा उमरर शेख, लष्कर -ए-तोयबाचा आजम चिमा व अब्दुल करीम टुंडा यांना भेटले. त्या वेळी मुंबईत राहणारा आमिर नोव्हेंबर 2001 मध्ये दुबईला पळून गेला. डिस्ोंबर 2001 मध्ये एका अपहरण प्रकरणात त्याचा भाऊ आसिफला गुजरात पोलिसांनी उचलले. एका कथित एन्काउंटरमध्ये आसिफ मारला गेला. त्यानंतर आमिर व आफताब यांनी 22 जानेवारी 2002 मध्ये कोलकाता अमेरिकन सेंटरवर हल्ला केला.

आयएमने दक्षिणेतही पाय रोवले
इंडियन मुजाहिदीनच्या नेटवर्कचा कर्नाटकातील प्रमुख रियाज भटकळ ऊर्फ रोशन व त्याचा भाऊ इकबाल पाकिस्तानात असल्याचे म्हटले जाते. आता आयएमच्या दक्षिण विभागाचा म्होरक्या यासीन भटकळ ऊर्फ अहमद सिद्दिबप्पा जरार ऊर्फ शाहरुख हा कर्नाटकातील भटकळचा रहिवासी आहे. रियाज व इकबाल पाकिस्तानात पळून गेल्यानंतर यासीनकडे संघटनेची सूत्रे आली. त्याला पाकिस्तानातील जैश -ए-मोहंमदचा सूत्रधार मसूद अजहरचा भाऊ अतहर हा मदत करत आहे. यासीन जिहादच्या नावावर युवकांची दिशाभूल करतो. नंतर त्यांना पाकिस्तानात नेऊन तेथे दहशतवादी प्रशिक्षण दिले जाते.

रझा कमांडो फोर्स बनवली होती
आमिर रझाने याआधी रझा कमांडो फोर्स तयार केली होती. त्यानेच नंतर इंडियन मुजाहिदीन तयार केली. आयएमने 2005 नंतर अनेक शहरांत बॉम्बस्फोट घडवले. 2006 मध्ये मुंबई, हैदराबादेत गोकुळ चाट भांडार, 2007 मध्ये उत्तर प्रदेशच्या न्यायालयात व 2006 मध्ये बनारसच्या हनुमान मंदिरात स्फोट घडवले. आयएमने 2008 मध्ये बंगळुरू, अहमदाबाद, जयपूर, दिल्लीत स्फोट घडवले. इंडियन मुजाहिदीनचा उत्तर भारतातील म्होरक्या आतिफ 19 सप्टेंबर 2008 ला बटला हाऊस एन्काउंटरमध्ये मारला गेला, तर दक्षिण भारतातील म्होरक्या सादिक शेख मुंबईत सप्टेंबर 2008 ला पकडला गेला.