आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrorist Outfits Planning To Take Revenge Of Afzal Guru Execution

अफझल गुरुच्‍या फाशीचा बदला घेण्‍याची दहशतवादी संघटनांची धमकी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- संसदेवरील हल्‍ल्‍याचा मास्‍टरमाइंड अफझल गुरुला फाशी दिल्‍यानंतर पाकिस्‍तानातील दहशतवादी संघटना बदल्‍याच्‍या तयारीत आहेत. भारतात घातपात घडविण्‍याची तयारी या संघटनांनी केली आहे. इस्‍लामाबाद, कराची, पेशावर तसेच मुजफ्फराबाद येथून येणारे कॉल्‍स इंटरसेप्‍ट करुन ही माहिती काढली आहे. लष्‍कर-ए-तोयबा ही संघटना घातपात घडवू शकते, असा आयबीचा इशारा आहे. त्‍यानुसार दक्षतेचा इशाराही देण्‍यात आला आहे. राजधानी दिल्‍ली तसेच देशातील महत्त्वाच्‍या शहरांमध्‍ये सुरक्षा वाढविण्‍यात आली आहे.

अफजल गुरुला फाशी दिल्‍यानंतर त्‍याचे सामान कुटुंबियांना सोपविण्‍यात येऊ शकते. त्‍याच्‍या कुटुंबियांनी ही मागणी केली आहे. तिहार तुरुंगाचे वरिष्‍ठ अधिकारी यासंदर्भात कायदेशीर कारवाई करतील. अनेक पुस्‍तके तसेच रेडीओ, हे साहित्‍या अफझलच्‍या सामानात समाविष्‍ट आहे.