आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrorist Use The Pakistan Solider Tools For Infitration; Military Give Alarm Bell

पाकिस्तानी सैनिकांची सामग्री घेऊन दहशतवाद्यांची घुसखोरी ;लष्कराचा इशारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जम्मू-काश्मिरात काही दिवसांपूर्वी पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडे पाकिस्तानी सेना वापरत असलेले विशिष्ट प्रकारचे इंधन आणि पावडर आढळून आली आहे. धूर न निघणारे आणि पुन्हा वापरता येण्याजोगे हे इंधन अतिरेक्यांकडे सापडल्याने लष्कर व गुप्तचर अधिकच सतर्क झाले आहेत. अशा प्रकारचे इंधन व शस्त्रसज्ज अतिरेकी कडाक्याच्या थंडीतही घुसखोरी करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

कडाक्याच्या थंडीत, बर्फवृष्टी होत असताना काश्मिरात सर्वसाधारणपणे घुसखोरी होत नाही, असा आजवरचा अनुभव होता. मात्र, जर्मनीत तयार होणारे हे खास इंधन अतिरेक्यांकडे सापडल्याने हिवाळ्यातही घुसखोरीचा मोठा प्रयत्न होणार असल्याचा अंदाज असून लष्कराने सरहद्दीवरील तुकड्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पूंछ भागातील भिंबर गल्ली येथून कडाक्याच्या थंडीतही चार अतिरेकी घुसखोरी करण्यात यशस्वी झाले होते. या अतिरेक्यांकडे विशिष्ट प्रकारचे इंधन सापडले होते. या घटनेची गृह आणि संरक्षण मंत्रालयाच्या बैठकीत गंभीर दखल घेण्यात आली. या बैठकीस जम्मू-काश्मीरचे पोलिसही हजर होते.
दीर्घकाळ जळणा-या क्यूबस्
अतिरेक्यांकडे सापडलेल्या दीर्घकाळ जळणा-या इंधनाच्या क्यूब्स जर्मन बनावटीच्या आहेत. या क्यूबमधून धूर निघत नाहीत. त्या विझवून पुन्हा वापरता येतात. कुपवाडा, गुरेझसारख्या दुर्गम, उंचउंच शिखरे असलेल्या भागातून घुसखोरी केलेल्या अतिरेक्यांकडे ही सामग्री सापडली होती.
न वितळणारे इंधन
हेक्झामाइन आॅरगॅनिकचा वापर करण्यात आलेल्या या क्यूबस म्हणजे घन इंधनाचा प्रकार आहे. त्याच्या छोट्या टॅब्लेट्स तयार करण्यात येतात. या टॅब्लेट्स जाळल्यानंतर त्यातून धूर निघत नाही. तसेच जळताना वितळतही नाहीत.
तोयबा,जैशला पुरवठा
सियाचीन ग्लेशियरवर पहारा देणा-या पाकिस्तानी सैनिकांना देण्यात येणारे क पडे, सामग्री दहशतवादी संघटना लष्कर -ए -तोयबा, जैश-ए-मोहंमदला पुरवण्यात येतात. सन 2012 मध्येही कडाक्याच्या थंडीत तोयबाच्या अतिरेक्यांनी सोपोर भागात घुसखोरी केली होती.