आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The ib has received inputs that isi may attempt an attack during campaigning when politicians

सोनिया गांधी, राहुल, प्रियंकावर आयएसआयकडून होऊ शकतो हल्‍ला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- भारतीय गुप्‍तचर संस्‍थेकडून (आयबी) पाच राज्‍यांतील निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्‍यात आला आहे. या राज्‍यांतील निवडणूक प्रचारादरम्‍यान देशातील प्रमूख नेत्‍यांवर पाकिस्‍तानी गुप्‍तचर संघटना आयएसआयकडून हल्‍ला होण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे ज्‍या नेत्‍यांना विशेष सुरक्षा (एसपीजी) पुरवण्‍यात आली आहे, त्‍यांची सुरक्षा आणखी वाढवण्‍यास आयबीने त्‍या-त्‍या राज्‍यांच्‍या पोलिस प्रमूखांना सूचना दिली आहे. या नेत्‍यांमध्‍ये पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधीयांच्‍यासह राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वधेरा यांचा समावेश आहे.

पाकिस्‍तानची गुप्‍तचर संस्‍था आयएसआय नेपाळमधील आपल्‍या हस्‍तकांच्‍या संपर्कात आहे, अशी माहिती आयबीला मिळाली असून या हस्‍तकांकरवी निवडणूक प्रचारादरम्‍यान या नेत्‍यांवर ते हल्‍ला करू शकतात.

निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर झेड सुरक्षा प्राप्‍त डझनभर नेत्‍यांच्‍या सुरक्षेत वाढ करण्‍याचे आयबीने सांगितले आहे. गर्दीच्‍या ठिकाणी किंवा रोड शो दरम्‍यान नेत्‍यांनी जाणे टाळावे, असा सल्‍लाही देण्‍यात आला आहे. सरकारी सूत्रांच्‍या हवाल्‍याने एका इंग्रजी वृत्तपत्राने ही माहिती दिली आहे. राहुलचा आदेश मिळाल्यास प्रचार -प्रियंका गांधी भारताच्या अनेक कॅबिनेट मंत्र्यांना भेटलाय आयएसआय एजंट फई बिहारमधून संशयित आयएसआय एजंटाला अटक