आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Sixth Accused In The December 16 Gangrape And Murder Case Of A Girl Declared A Juvenile By The Juvenile Justice Board

दिल्‍ली गँगरेप प्रकरणातील \'तो\' आरोपी अल्‍पवयीनच, ज्‍युव्‍हेनाईल बोर्डाचा निर्वाळा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- दिल्‍लीमध्‍ये 16 डिसेंबर 2012 रोजी रोजी झालेल्‍या सामुहिक बलात्‍कारप्रकरणातील सहाव्‍या आरोपीला ज्‍युव्‍हेनाईल जस्‍टीस बोर्डाने अल्‍पवयीन ठरविले आहे. त्‍यामुळे कायद्यानुसार त्‍याच्‍यावर फास्‍ट्र ट्रॅक कोर्टात खटला चालविता येणार नाही. तसेच त्‍याला कठोर शिक्षाही होणार नाही.

दिल्‍लीत झालेल्‍या बलात्‍कार प्रकरणात एक आरोपी अल्‍पवयीन असल्‍याचा दावा करीत होता. त्‍यामुळे त्‍याचे नाव जाहिर करण्‍यात आले नव्‍हते. त्‍याचे वय पडताळण्‍यासाठी ज्‍युव्‍हेनाईल जस्‍टीस बोर्डाकडे प्रकरण सोपविण्‍यात आले होते. बोर्डाने आज यासंदर्भात निर्णय जाहिर केला. त्‍याचे वय 17 वर्षे 6 महिने आणि 11 दिवस असल्‍याचे बोर्डाने जाहिर केले. याच अल्‍पवयीन आरोपीने सामुहिक बलात्‍कार पीडित तरुणीवर दोन वेळा बलात्‍कार केला होता. तसेच त्‍याने तिच्‍या गुप्‍तांगात लोखंडी रॉड निर्दयीपणे घुसवून आतड्या बाहेर काढल्‍या होत्‍या. सर्वाधिक अत्‍याचार करुन जीवघेण्‍या जखमा दिल्‍या होत्‍या. त्‍यालाही फाशीच दिली पाहिजे, अशी मा‍गणी पीडितेच्‍या कुटुंबियांनी केली आहे.