आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Task Of Safeguarding The Country's Coastline Has Been Assigned To Two Daughters.

Women's Day Special : समुद्रावर राज्य करतात हरियाणाच्या या रणरागिणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिस्सार - हरियाणाच्या दोन रणरागिणींनी भारताच्या नौदालामध्ये सहभागी होऊन समुद्री सुरक्षेची जबाबदारी यशस्वी सांभाळलेली आहे. रुचि सांगवान आणि भावना राणा या त्या धाडसी मुली आहेत. या दोघींच्या माध्यमातून भारतात प्रथमच नौदलात सुरक्षेची जबाबदारी महिलांवर सोपवण्यात आली आहे.
रुचि चेन्नई आणि भावना राणा दीव-दमन येथे आपली जबाबदारी सांभाळीत आहेत. दोघीही चेतक चॉपरमधून उड्डाण घेऊन काही मिनीटांमध्येच शोध आणि बचाव कार्यासाठी हजर होतात. या रणरागिनींवर त्यांच्या कुटुंबालाच नाही तर संपूर्ण गावाला अभिमान आहे. या भागातील इतर मुलींसाठी तर त्या आयकॉन ठरल्या आहेत. येथील अनेक मुलींचे स्वप्न आता त्यांच्यासारखेच होण्याचे आहे.
या मुलींच्या धाडसामागे त्यांच्या कुटुंबाचा प्रगतीशील विचार आहे. आज त्या केवळ वैमानिक होऊन अवकाशात भरारी घेत नाहीत तर, त्यांनी कोस्ट गार्डच्या रुपाने समुद्रालाही आपल्या कवेत घेतले आहे. रुचिच्या दृष्टीने महिला सशक्तीकरण म्हणजे, मुलींना त्यांच्या पायावर उभे करणे आहे.
दीव-दमन येथे असिस्टंट कमांडेट पदावर कार्यरत असलेल्या भावनाच्या मते, जो पर्यंत मुलींना स्वतंत्र्यरित्या विचार करण्याची संधी मिळत नाही तोपर्यंत त्या सशक्त होणार नाहीत. एका महिलेमध्ये कुटुंब आणि समाजाला बदलण्याची ताकद असल्याचेही तिचे म्हणणे आहे.
रुचि आणि भावनाच्या समुद्रावरील या जबाबदारीने महिलांना जोखमीच्या कामातही अग्रेसर राहाण्याची संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.