Home »National »Other State» The Well Was Derived From The 120 Corpses Of Martyrs

जालियनवाला बाग हत्याकांड ब्रिटिशांसाठी लाजिरवाणी घटना - डेव्हिड कॅमेरुन

दिव्य मराठी वेब टीम | Feb 20, 2013, 15:44 PM IST

अमृतसर - ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांनी आज जालियनवाला बाग हत्याकांडातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली. ब्रिटीश इतिहासातील ही सर्वात लाजिरवाणी घटना असल्याचे ते म्हणाले.

जालियनवाला बाग हत्याकांडाने आजही ह्रदयाचा थरकाप उडतो. निशस्त्र लोकांवर ब्रिटश सैनिकांनी जनरल डायरच्या आदेशाने बंदूकीच्या फैरी झाडून प्रेतांचा खच पाडला होता. जीवांच्या आकांताने सैरावेरा धावणा-यांनी जालियनवाला बागेतील विहिरीत उड्या घेतल्या. त्या विहिरीतून नंतर १२० मृतदेह बाहेर काढण्यात आले होते.

भारत दौ-यावर असलेले ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांनी आज जालियनवाला बागेतील शहिदांना पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली.
कॅमरुन यांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर अमृतसर पोलिसांनी सुरक्षेचा चोख बंदोबस्त तैनात केला आहे. कॅमरुन यांच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी ब्रिटीश संरक्षण यंत्रणेकडे आहे.

Next Article

Recommended