आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thirteen BJP MLAs Loyal To B S Yeddyurappa Submit Resignation

कर्नाटक : भाजपच्या 13 येड्डीसमर्थक आमदारांचा राजीनामा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरु- कर्नाटक जनक्रांती पार्टीचे अध्यक्ष व भाजपचे माजी नेते बी. एस. येड्डियुरप्पा समर्थक 13 भाजपच्या आमदारांनी आज विधानसभेचे अध्यक्ष के. जी. बौपय्या यांच्याकडे सादर केले. दरम्यान, भाजप पक्षाने व मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी या आमदारांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.

येडिड्समर्थक भाजपच्या दोन मंत्र्यांनी मागील आठवड्यात राजीनामा दिला होता. त्यामुळे सरकार अल्पमतात आले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कर्नाटकचे राज्यपाल भारद्वाज यांनी सरकारचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. दरम्यान, सरकारला कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात येत आहे. कर्नाटकात विधानसभेच्या निवडणूका येत्या मे महिन्यात होणार आहेत.