Home »National »Other State» Thirteen Mal Resigning Karnatka Bjp Goverment In Cirise

तेरा आमदारांनी राजीनामा दिल्याने कर्नाटकात भाजप सरकार संकटात

वृत्तसंस्था | Jan 26, 2013, 07:35 AM IST

  • तेरा आमदारांनी राजीनामा दिल्याने कर्नाटकात भाजप सरकार संकटात

बंगळुरू - येड्डी समर्थक 13 आमदारांनी शुक्रवारी राज्यपाल हंसराज भारद्वाज यांच्याकडे राजीनामा सोपवल्याने मुख्यमंत्री जगदीश शेट्टार सरकारला घरघर लागली आहे. यानंतर गरज पडल्यास 4 फेब्रुवारी रोजी शेट्टार यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितले जाईल, असे भारद्वाज यांनी म्हटले आहे.
भारद्वाज यांची भेट घेतल्यानंतर शेट्टार म्हणाले की, आपल्या सरकारला कसलाही धोका नसल्याचे राज्यपालांना सांगितले आहे. आमच्याजवळ बहुमत आहे. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यास सांगितले काय, या प्रश्नावर शेट्टार म्हणाले की, या मुद्द्यावर आमची चर्चा झाली नाही. मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देण्यासाठी राज्यपालांकडे गेलो होतो. 4 फेब्रुवारी रोजी होणा-या विधानसभेच्या संयुक्त अधिवेशनाचे निमंत्रण देण्यासाठी त्यांच्याकडे गेलो होतो. या भेटीआधी भारद्वाज म्हणाले की, मी एक आदेश तयार केला आहे. त्यानुसार शेट्टार यांना विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करण्यास सांगितले जाऊ शकते परिस्थितीचा आढावा घेऊन बहुमत सिद्ध करण्यास सांगितले जाऊ शकते.

Next Article

Recommended