आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'रॉ' कडून पंतप्रधान कार्यालयाला अलर्ट; भारत- चीनमध्ये युद्ध?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली: भारत- चीनमध्ये पुन्हा एकदा युद्धाचे ढग गोळा झाल्याचे चित्र आहे. याबाबत भारतीय गुप्तचर संस्था 'रॉ' ने पंतप्रधान कार्यालयाला अलर्ट पाठवला आहे. चीनकडून भारताला विनाकारण उत्ते‍‍जित करण्‍याचा प्रयत्न केला जात असल्याचे 'रॉ'ने त्यात म्हटले आहे.
'हेडलाइन्स टुडे'च्या वृत्तानुसार 'रॉ'ने गेल्या आठवड्यात एक गोपनिय अहवाल सरकारला पाठविला होता. चीनकडून भारतीय सीमेवर घुसखोरी करण्‍याचा प्रयत्न होत आहे. त्यातून भारतीय सैन्याला युद्धासाठी उत्तेजितही करण्‍याचा प्रयत्न केला जात आहे.
एका बाजूला भारत-चीनचे संबंध ताणले गेले असताना 'रॉ'कडून आलेला अलर्ट फारच चिंताजनक असल्याचे अधिकार्‍यांनी म्हटले आहे.
भारत- चीनमध्ये युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकेची मदत घेऊन भारत आपली ताकद वाढण्यासाठी तयारी करीत आहे. तर चीन विनाकारण भारतीय सीनेवर घुसखोरी करत असल्याचे चित्र आहे.
भारताचा कायम विरोध असतानाही चीनने अरुणाचल प्रदेश हा तिबेटचा भाग असल्याचा दावा केला आहे. भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर चीनच्या हालचालीही संशयास्पद असल्याचे 'रॉ'ने अहवालात म्हटले आहे. भारताने व्हिएतनामच्या विनंतीवरून दक्षिण चीनमधील समुद्रात तेल शोधण्याचा कार्यालाही चीनने विरोध दर्शविला होता.
काही महिन्यांनी भारत-चीन युद्धाला 50 वर्षे पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर 'रॉ'ने पाठवलेल्या अहवालावर भारत सरकार गांभिर्याने विचार करीत आहे, असे समजते.
1962 चे युद्ध नेहरुंना धडा शिकविण्‍यासाठी होतेः चीन
चीन अंतराळ तंत्रज्ञानात अमेरिकेला ‘पछाडणार’
चीन सायबर युध्द छेडण्याच्या तयारीत