आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Threat To Kashmiri Pandit Give Up Jammu Kashmir Union Home State Home Minister R P N Singh

पंडितांना जम्मू-काश्मीर सोडण्यासाठी धमक्या- आर. पी. एन. सिंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काश्मिरी पंडितांना जम्मू-काश्मीर सोडण्यासाठी धमकी मिळाली असल्याची कबुली सरकारने दिली आहे. गृहराज्यमंत्री आर. पी. एन. सिंग यांनी लेखी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. एक आठवड्याच्या आत जम्मू-काश्मीर सोडा, अशी धमकी देणारे पत्र आणि पोस्टर बडगाम येथील पंडित कॉलनी शेखपुराच्या सचिवाला पोस्टाने आले होते.

मात्र धमकी देणारे पत्र कोणत्या दहशतवादी संघटनेने पाठवले हे स्पष्ट झाले नाही, असे जम्मू-काश्मीर सरकारच्या अहवालात म्हटले आहे. या पत्रानंतर काश्मिरी पंडितांच्या कॉलनीस पुरेसे संरक्षण देण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी एफआयआरही नोंदवण्यात आला, असे सिंग यांनी लेखी उत्तरात सांगितले. काश्मीर खो-यात सध्या 4 हजार पंडित वास्तव्यास आहेत.