आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Threats Of Gangrape Llike Delhi To Kashmir's First Rock Band Girls

काश्मीरमधील पहिल्या गल्र्स रॉक बँडला धमक्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - काश्मिरातील मुलींचा पहिला व एकमेव रॉक बँड ‘प्रगाश’ला ऑनलाइन धमक्या येत आहेत. दिल्लीतील गँगरेप पीडितेसारखे हाल केले जातील, अशा कट्टरपंथीयांकडून येणार्‍या धमक्यांमुळे मुलींनी लाइव्ह प्रोग्राम बंद केला आहे.

सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचा पुरस्कार मिळाल्याने गतवर्षी डिसेंबरमध्ये हा बँड चर्चेत आला होता. नोमा नजीर (गिटारवादक आणि गायिका), ड्रमर फराह दीबा आाि गिटारवादक अनीका खालीद यांनी गतवर्षी बँडची निर्मिती केली होती. ‘प्रगाश’ (तिमिरातून तेजाकडे) असे बँडचे नाव ठेवले होते. या तिन्ही मुली दहावीतील विद्यार्थिनी आहेत. फेसबुकवरून या बँडला पाठिंबाही मिळत आहे.