आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मू- भारताकडून तणाव दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच फ्लॅग मीटिंगनंतरही पाकिस्तानने तीन वेळा गोळीबार, तोफगोळे डागून शस्त्रसंधी मोडण्याचा अगोचरपणा केला आहे. नॉर्दर्न कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल के.टी.परनायक यांनी ही माहिती दिली. सोमवारी ब्रिगेडियर पातळीवरील बैठक होऊनही पाकिस्तानने तीन वेळा शस्त्रसंधी मोडली. काश्मीर सरहद्दीवरील मेंधार, बालनोई आणि उरी क्षेत्रामध्ये पाकिस्तानने गोळीबार केला. या गोळीबार व हल्ल्यांना भारताने प्रत्युत्तर दिले नाही.गोळीबार सुरू असल्याचे हॉटलाईनवर पाकिस्तानी आधिका-या ंना कळवताच गोळीबार बंद झाला, असेही परनायक यांनी सांगितले. पाकिस्तानने नेहमीप्रमाणे गोळीबाराचा आरोप फेटाळला आहे.
शेजा-यांचा कुटिल डाव
उरी क्षेत्रात गोळीबार करण्यामागे पाकिस्तानचा कुटिल डाव असल्याचे परनायक यांनी म्हणाले. उरी क्षेत्रातील काही भागात गोळीबाराच्या आडोशाने दहशतवाद्यांना घुसवण्याचा हा डाव असल्याचे त्यांनी सांगितले. देशाला चीनकडून नव्हे, तर पाकिस्तानकडून धोका आहे. नियंत्रण रेषेजवळ युद्धजन्य परिस्थिती नाही. पाकव्याप्त काश्मिरात चीनच्या मदतीने रस्ते, पूल आदींची उभारणी केली जात आहे. सीमेच्या पलीकडे चीनचे जवानही तैनात आहेत, असे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.