आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाइम मॅगझिनची पंतप्रधानांच्या कुवतीवर शंका; मात्र संयुक्त राष्ट्रसंघाकडून कौतुक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/न्यूयॉर्क- अमेरिकेतील प्रतिष्ठित ‘टाइम’ मॅगझिनच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे छायाचित्र ‘अंडरअचीव्हर’ म्हणून प्रसिद्ध करण्यात आले आहे. आर्थिक विकासाच्या आघाडीवर देशाची घडी बसवण्यासाठी सुधारणांच्या ठरावीक मर्यादेपुढे जाऊन डॉ. मनमोहनसिंग धडाडीचे निर्णय घेऊ शकले नसल्याचे ‘टाइम’ने नमूद केले आहे.
दुसरीकडे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात मात्र देशाचा सकारात्मक पैलू स्पष्ट करण्यात आला आहे. बड्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी भारत चीन आणि अमेरिकेनंतर तिस-या क्रमांकाच्या पसंतीचा देश असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. येत्या दोन वर्षांत भारतामध्ये 20-25 टक्के दराने थेट परदेशी गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी भारतात 30 टक्के दराने 3,200 कोटी डॉलर (1.76 लाख कोटी रुपये) एवढी थेट परदेशी गुंतवणूक झाली होती.
मॅगझिनचा दावा
- भ्रष्टाचार, घोटाळ्यांनी घेरलेले सरकार सुधारणांची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरत आहे.
- आर्थिक विकासाचा वेग कायम राखण्यासाठी आणि रोजगारवाढीला चालना देण्यासंबंधीची विधेयके संसदेत अडकून पडली आहेत.
- मतांसाठी योजना आखण्याच्या नादात सुधारणा मागे पडल्या आहेत.
- वित्तीय तूट, आर्थिक विकासाच्या आघाडीवर सुस्तावलेली परिस्थिती आणि रुपयाचे अवमूल्यन रोखण्यात पंतप्रधान असहाय.
- मते गमावण्याच्या भीतीपोटी सरकार सबसिडीवर प्रचंड पैसा खर्च करण्यास हतबल.
- कोळसा खाणींच्या वाटपात अनियमितता असल्याच्या आरोपांमुळे डॉ. सिंग यांची प्रतिमा डागाळली.
- मंत्र्यांवर पंतप्रधानांचे नियंत्रणच नाही.

2 वर्षांत बदलले ‘टाइम’
2010 : कौतुक- एप्रिल 2010 मध्ये टाइम मॅगझिनने डॉ. सिंग यांना जगातील पहिल्या 100 प्रभावी व्यक्तींच्या यादीत निवडले होते. त्यात ते 19 व्या स्थानावर होते. तेव्हा इंद्रा नुई म्हणाल्या होत्या, देशाला महाशक्ती म्हणून उदयास आणण्याच्या दिशेने डॉ. सिंग वाटचाल करत आहेत.जागतिक विकासाच्या दृष्टीने भारत एक महत्त्वाचे इंजिन ठरला आहे.
2012 : टीका- ताज्या अंकात डॉ. सिंग अंडरअचीव्हर असल्याचे म्हटले आहे. एक असा पंतप्रधान जो निर्णय घेऊ शकत नाही. शिवाय आपल्याच मंत्र्यांपुढे तो लाचार आहे.
डॉ. मनमोहनसिंग यांची देण
भ्रष्टाचार - आठ वर्षांत 2 जीसह 15 लाख कोटी रुपयांचे घोटाळे उघडकीस. पंतप्रधानांसह 14 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप. चार मंत्र्यांनी आतापर्यंत राजीनामे दिले आहे.
महागाई- 3 वर्षांपासून महागाईच्या दराने दशक गाठले. मे महिन्यात तो 10.74 टक्के होता. गेल्या 3 वर्षांत पेट्रोल 36 रुपयांनी महागले.
विकास दर- 6.5 टक्क्यांवर स्थिर. गेल्या 9 वर्षांत सर्वांत कमी. हा दर 9 टक्क्यांवर आणू असा दावा होता. दोन दिवसांपूर्वी माँटेकसिंग यांनी सांगितले की, येत्या 5 वर्षांत हे शक्य नाही. एक वर्षांत रुपयाचे मूल्य 25 टक्क्यांनी घटले.
धोरणात फेल- सबसिडी कमी करण्यात पूर्णत: अपयशी, आर्थिक विकास, रोजगारवाढीला चालना तसेच एफडीआयसह 50 हून अधिक महत्त्वाची विधेयके प्रलंबित.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी देणार राहुलला टक्कर - टाईम
मनमोहन सिंग आत्‍मघातीः टाईम मॅगझिनचे विश्‍लेषण
काळ्या पैशावर जादूची कांडी नाही : मनमोहन सिंग