आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - आगामी 2014च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना प्रोजेक्ट करण्याची मागणी भाजपचे नेते यशवंत सिन्हा यांनी सोमवारी केली. यामुळे भाजपला फायदा होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
मोदी यांच्या नावावर हरकत असेल तर रालोआतील घटक पक्ष जदयूने साथ सोडून द्यावी, असेही सिन्हा यांनी म्हटले आहे. वास्तविक बिहारमध्ये भाजप आणि जदयू युतीचे सरकार आहे. जदयू हा भाजपचा सर्वात जुना मित्रपक्ष आहे. जातो तेथे लोक मोदी यांना पीएमपदासाठी प्रोजेक्ट करावे असे म्हणतात. माझेही तसेच मत आहे. आता निर्णय पक्षाला घ्यायचा आहे.
दरम्यान, वेळ येईल तेव्हा भाजप उमेदवार ठरवणार आहे. याबाबत मीडियालाच एवढी उत्सुकता का, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे. त्यातच आघाडीबाबत सिन्हा यांचे वक्तव्य अनावश्यक आहे. यावर भाजपाध्यक्ष किंवा प्रवक्त्याकडे प्रतिक्रिया विचारले पाहिजे, असे रालोआचे संयोजक शरद यादव यांनी म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.